आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश टिळक नाशिकमध्ये आज देणार करिअरचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-आवडीप्रमाणे आणि क्षमता बघूनच शिक्षण घ्या आणि ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या क्षेत्राची आणि एकूणच व्यवहाराची खडान्खडा माहिती घ्या.. त्यानंतरच त्या क्षेत्रात संपूर्ण आत्मविश्वासाने पाऊल ठेवा. यश तुमचेच असेल.. अर्थात, त्यासाठी उत्तम ‘नेटवर्किंग’ हा आजच्या तंत्रज्ञान युगातील एक प्रभावी मार्ग आहे. ‘स्मार्ट नेटवर्किंग’ हाच ‘स्मार्ट करिअर’चा नवा मंत्र आहे.. अशा शब्दांत मुंबईच्या ‘रिझ्युमे मॅनेजमेंट कन्सल्टंट्स’चे संचालक व हेडहंटर गिरीश टिळक यांनी तरुणाईला बहुमोल सल्ला दिला.

दैनिक ‘दिव्य मराठी’ व ‘मैत्रेय फाउंडेशन’ यांच्या वतीने शुक्रवारी (दि.17) विद्यार्थी, युवक, पालकांसाठी औरंगाबाद येथील एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात विनाशुल्क कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गिरीश टिळक यांनी अनौपचारिक गप्पांच्या मैफलीतून युवावर्गासह पालकांशी सहजच संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेपेक्षा मित्रत्वाच्या भूमिकेला पहिल्यापासूनच मनसोक्त दाद मिळाली आणि गप्पांची मैफल बहरत गेली. नेटवर्किंगच्या माध्यमातून स्वत:चा मार्गदर्शक मिळवण्यासाठी खस्ता खाण्याची तयारी हवी. मात्र, तुम्हाला काय पाहिजे, याची संकल्पना स्पष्ट असेल तर निश्चितच माहितीतून योग्य मार्ग मिळेल व करिअरला दिशा मिळेल, असेही हेडहंटर टिळक यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे बिझनेस हेड निशित जैन यांनी टिळक यांचे, तर निवासी संपादक धनंजय लांबे यांनी ‘मैत्रेय’चे रवी जोशी यांचे स्वागत केले. डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.

उद्योग जगतात नोकरीची संधी कशी मिळवायची, याबद्दल ‘रिझ्युमे मॅनेजमेंट कन्सल्टंट्स’चे संचालक आणि प्रख्यात हेडहंटर गिरीश टिळक मार्गदर्शन करणार आहेत. ‘दिव्य मराठी’ आणि मैत्रेय फाउंडेशनतर्फे शनिवारी (दि. 18) सकाळी 11 वाजता पंचवटीतील महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात येईल. त्यात विद्यार्थी, पालकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. टिळक यांना काही प्रश्न विचारण्याची संधीही कार्यशाळेत दिली जाईल. या प्रश्नांना टिळक उत्तरे देणार आहेत. या कार्यक्रमास महात्मा गांधी विद्यामंदिरचे सहकार्य लाभले आहे.

  • विद्यार्थ्यांनी शोधावा स्वत:चा ‘मेंटॉर’
  • पाल्याची बलस्थाने व र्मयादा ओळखा
  • शिक्षण बाजारीकरणाने शिक्षक नव्हे तर पालकच होऊ शकतात कुंभार व घडवू शकतात पाल्यांचा घडा.


पालकांनी व्हावे कुंभार..

  • स्मार्ट नेटवर्किंग, स्मार्ट करिअर
  • करिअर करण्यासाठी इच्छित क्षेत्राची माहिती मिळवण्याचे ध्येय ठेवा
  • त्या-त्या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधून माहिती मिळवा
  • संवादासाठी कुठल्याही क्षेत्राचे, व्यक्तीचे बंधन नको