आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविप्र मॅरेथाॅन स्पर्धेमध्ये बाजी गिरीशचंद्र तिवारीची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नाशिकचे स्टार : नाशिकच्या माेनिका अाथरेने महिलांच्या अर्धमॅरेथाॅनमध्ये तास २४ मिनिटे सेकंदात, तर सुरेश वाघने पुरुषांच्या अर्धमॅरेथाॅनमध्ये तास मिनिटे ५८ सेकंद अशी वेळ देत दुसरा क्रमांक पटकावला. )
नाशिक - मविप्र अायाेजित ‘मविप्र मॅरेथाॅन’ स्पर्धेत बंगळुरूच्या गिरीशचंद्र तिवारी याने बाजी मारून लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला. महिलांच्या अर्धमॅरेथाॅनमध्ये माेनिका अाथरेने पहिला, तर पुरुष अर्धमॅरेथाॅनमध्ये नाशिकच्या सुरेश वाघ याने द्वितीय क्रमांक पटकावला. १६ गटांमध्ये तब्बल ३५०० स्पर्धकांनी सहभाग नाेंदवलेल्या या स्पर्धेच्या शुभारंभासह पारिताेषिक वितरण साेहळ्यास लाभलेली प्रख्यात कुस्तीपटू नरसिंह यादव यांची उपस्थिती खेळाडूंचा उत्साह वाढवणारी ठरली.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक असल्याचे नरसिंह यादव यांनी सांगितले. नाशिकचे वातावरणदेखील खेळाडूंसाठी अत्यंत चांगले असल्याने इथे प्रत्येक खेळातील राष्ट्रीय, अांतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मॅरेथाॅनमध्ये सहभागी हाेण्याचे प्रमाण वाढत असल्याबद्दल अानंद व्यक्त केला. गिरीशचंद्र याने तास २७ मिनिटे सेकंदात विजेतेपद पटकावले. यावेळी सभापती अॅड. नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, चिटणीस डाॅ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खातळे, डाॅ. तुषार शेवाळे, कृष्णाजी भगत, मुरलीधर पाटील अादी उपस्थित हाेते. स्पर्धेनंतर साेळाही गटांतील विजेत्यांना गाैरविण्यात अाले. यावेळी तब्बल सव्वासात लाख रुपयांच्या बक्षिसांचेही वितरण करण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...