आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl And Grand Father Drown In Water Well Nashik

नातींना वाचवताना आजोबांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळा - महालपाटणे (ता. देवळा) येथे बुधवारी विहिरीत पडलेल्या नातीला वाचविण्यासाठी गेलेल्या आजोबांसह दुसर्‍या नातीचाही मृत्यू झाला. दरम्यान, सर्वात प्रथम विहिरीत पडलेली नात मात्र या घटनेतून सुदैवाने बचावली आहे.

इंदिरा छबू भाटेलाल (वय 13) ही विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. या विहिरीला जमिनीपासून सहा फुटांवर एक टप्पा आहे. त्या टप्प्यावर वाकून इंदिरा हंड्याने पाणी भरत असताना हंडा पाण्यात सरकला. हंड्याला धरण्याच्या प्रयत्नात इंदिराचा तोल गेल्याने ती विहिरीत पडली. तिची बहीण मंगला भाटेवालने (वय 16) हे पाहिल्यानंतर तिनेही पाण्यात उडी घेऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मंगलाच्या आवाजावरून त्यांचे आजोबा राजाराम शंकर भाटेवाल (वय 80) यांनीही त्यांना वाचविण्यासाठी विहिरीतील पाण्यात उडी मारली. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने राजाराम भाटेवाल व मंगला यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर सर्वात प्रथम विहिरीत पडलेल्या इंदिराने मात्र विहिरीच्या एका कठड्याला घट्ट धरल्याने ती या घटनेतून आश्चर्यकारकरित्या वाचली. मंगला महालपाटणे येथील व्यंकटराव हिरे विद्यालयात दहावीत शिकत होती.