आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने नाशिकमध्ये बालिकेचा डेंग्यूने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - जुने नाशिक भागातील अजमेरी चौक येथील अक्सा अमजद सय्यद (वय 2) या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. सय्यद कुटुंबातील एकुलती अक्सा दोन-तीन दिवसांपासून आजारी होती. उपचारांसाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तिला डेंग्यू असल्याचे निदान झाले होते. उपचारांदरम्यान मध्यरात्री एकला तिचा मृत्यू झाला. सिडको परिसरातील युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, या बालिकेचाही डेंग्यूने मृत्यू झाल्याने पालिकेकडून राबविल्या जात असलेल्या स्वच्छता मोहिमेविषयी प्रश्न निर्माण होत आहे.