आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार मागे घेताना धडक, शिंदे पळसेत बालिकेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका दीड वर्षीय बालिकेला कारची धडक बसल्याने या अपघातात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिंदे पळसे भागात घडली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे भागात असलेल्या मंजुळा मंगल कार्यालयात एक विवाह समारंभ हाेता. या वेळी मंगल कार्यालयाजवळ राहणारी साक्षी अनिल हिंगोली (वय दीड वर्ष) ही खेळत असताना मारुती कार (एमएच १५ इएक्स ५६८७) मागे घेतली जात असताना या कारच्या चाकाखाली सापडल्याने ही बालिका गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, अनिल हिंगोली यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...