आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘उडान-२०१५’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्रीयमाध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसईने विद्यार्थिनींचा नामांकित अभियांत्रिकी संस्थांतील शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून ‘उडान-२०१५’ या संकल्पनेची घोषणा केली अाहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना अभियांत्रिकीसाठी नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
दहावीनंतर विद्यार्थिनींचे प्रामुख्याने आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये जाण्याचे प्रमाण अत्यल्प असते. हे प्रमाण वाढविण्यासाठी सीबीएसई प्रयत्न करणार आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना ११ वी आणि १२वीच्या वर्षांत सीबीएसई मार्गदर्शन करणार आहेत. ६० केंद्रांवरून ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे. यात अडचण येऊ नये म्हणून प्रति विद्यार्थिनी सहा हजार रुपये देण्यात येतील. ज्यातून टॅबलेट खरेदी करण्याची सूचना देण्यात अाली अाहे. विद्यार्थिनींच्या इयत्ता दहावीच्या गुणांवरून त्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल. मुलींच्या शिक्षणाला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी या कार्यक्रमात प्रयत्न केले जातील. याचबरोबर विद्यार्थिनींचा उत्साह कायम राहावा, यासाठी पालकांसह मार्गदर्शनाचे सत्र आयोजित केले जाणार आहेत.

या कार्यक्रमासाठी काही पात्रतेच्या अटी देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थिनीला इयत्ता दहावीला ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. त्याचबरोबर गणित आणि विज्ञान विषयामध्ये ८० गुणांपेक्षा जास्त गुण मिळविलेले असावेत. ज्या विद्यार्थिनी ग्रेडिंग सिस्टिमनुसार अभ्यास करत असतील त्यांना सीजीपीए आणि जीपीए असावा. तसेच विद्यार्थिनीने ११ वी विज्ञान शाखेला भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि गणित (मॅथ) विषय घेऊन प्रवेश घेतलेला असावा. या विद्यार्थिनींचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाख प्रतिवर्षापेक्षा कमी असावे हीदेखील अट देण्यात आली आहे.

अंतिम मुदत ऑगस्ट
येत्यािद. ऑगस्टपर्यंत विद्यार्थिनींनी या कार्यक्रमासाठी आपली नावे नोंदवायची आहेत. त्यासाठी सीबीएसईच्या संकेतस्थळावर अधिक माहिती प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थिनी कार्यक्रमाच्या अटींची पूर्तता करत असतील त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापासून या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे.
शिक्षणवाटा...