आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सतरा वर्षीय युवतीने केली महिला वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नाशिक- वाहतूक विभागाच्या पथकातील महिला पोलिस हवालदारास एका सतरा वर्षीय युवतीने मारहाण अाणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) सायंकाळी वाजता एसएमआरके महाविद्यालयाच्या समोर घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित युवतीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाहतूक विभागाच्या महिला पोलिस कर्मचारी वाकाेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरिष्ठ निरीक्षक नम्रता देसाई आणिपथक कॉलेजरोडवर हेल्मेटसक्तीची कारवाई करत असताना स्कुटी (एमएच १५ एफएच १२१०) वरून आलेल्या एका सतरा वर्षीय युवतीला हेल्मेट नसल्याने थांबवण्यात आले. नम्रता देसाई यांनी कागदपत्र मागितले. याचा राग आल्याने संशयित युवतीने आरडाओरड करून गर्दी जमा केली देसाई यांना शिवीगाळ केली. हवालदार वाकोडे या युवतीस समजावत असताना त्यांनी वाकोडे यांच्या श्रीमुखात लगावली. पथकातील इतर महिला कर्मचाऱ्यांनी युवतीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. डी. के. नगर येथे राहणाऱ्या युवतीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, युवती सतरा वर्षांची अाहे. वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने तिच्या वडिलांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  
बातम्या आणखी आहेत...