आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कंपनीतील लोक माझी छेड काढतात-टोमणे मारतात, म्हणून मी आत्महत्या करतेयं \'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर येथील एका खासगी कंपनीतील प्रशिक्षणार्थी तरुणीने सहकार्‍यांकडून सतत होणार्‍या छेडछाड आणि रॅगिंगला कंटाळून हाताच्या नसा ब्लेडने कापून घेत व गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती मृत्यूशी झुंज देत असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार युवतींसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुचेतानगरमध्ये राहणारी 19 वर्षीय ही तरुणी सातपूर वसाहतीतील बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते. तिच्यासमवेत आणखी काही दहा ते पंधरा जण आहेत. यातील चार तरुणी आणि सहा तरुणांकडून काही दिवसांपासून या तरुणीची छेड काढण्याचा प्रकार घडत होता. टोमणे मारणे, चेष्टामस्करीत तिला कमीपणा वाटेल असे बोलणे, असे प्रकार घडत असल्याने या दररोजच्या मानसिक त्रासाला ती कंटाळली होती. रविवारी रात्री 8.45 वाजता तिने घरात ब्लेडच्या साहाय्याने दोन्ही हातांच्या नसा कापल्या. रक्तस्राव होत असतानाही जीवनयात्रा संपवायचीच, या उद्देशाने छताच्या हूकला ओढणी बांधून घेऊन गळफास घेतला. सतत दरवाजा वाजवूनही तिने न उघडल्याने वडिलांनी तो जोरात ढकलून उघडला. गळफास घेतलेल्या मुलीला काही सेकंदांत ओढणी कापून सोडविले आणि तातडीने कमोदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्वरित उपचारही सुरू झाले. मात्र, दुसर्‍या दिवशीही तिची प्रकृती चिंताजनकच होती.