आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची अात्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाईक शिक्षण संस्थेच्या याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीने आत्महत्या केली. - Divya Marathi
नाईक शिक्षण संस्थेच्या याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
नाशिक - गंगापूररोड वरील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीत शिकत असलेल्या काजल संजय साळवे या विद्यार्थिनीने सोमवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारानंतर महाविद्यालयाच्या अावारात एकच खळबळ उडून पळापळ झाली. या विद्यार्थिनीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. प्रथमदर्शनी माेबाइलमधील ब्लू व्हेल गेममुळे किंवा परीक्षेच्या तणावातून अात्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात हाेता. पाेलिसांनी अात्महत्येच्या कारणाचा शाेध घेतला असताना प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा कयास करण्यात अाला.
 
शिवाजीनगर (सातपूर) भागात राहणारी काजल संजय साळवे (वय १८) ही बारावीत वाणिज्य शाखेत शिकत होती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात बारावीची चाचणी परीक्षा सुरू अाहे. सोमवारी सकाळी ते या वेळेत काजल इंग्रजीचा पेपर देऊन बाहेर पडली. अापल्या मैत्रिणींसाेबत ती काही वेळ महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये बसली. या ठिकाणी गप्पा मारून मैत्रिणींसाेबत बाेलत असतानाच तिला एक काॅल अाला. ताे काॅल घेऊन ती मैत्रिणींमधून बाेलत बाेलत बाजूला गेली. काही वेळातच बोलता बोलता तिने महाविद्यालयाच्या सहावा मजला गाठला. तिथेच काही वेळ बाेलत असतानाच ११ वाजेच्या सुमारास पॉलिटेक्निकच्या नवीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारल्याने माेठ्याने अावाज अाला. 

त्याचवेळी वाहनतळाजवळच असलेले सुरक्षारक्षक मच्छिंद्र पवार यांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने ते त्या दिशेला पळाले. समाेर बघताच एका अॅक्टिव्हा गाडीला लागून विद्यार्थिनीचे डाेके रक्ताच्या थाराेळ्यात पडलेले दिसले. हा प्रकार बघून घाबरलेल्या स्थितीतच सुरक्षारक्षकाने अारडाअाेरड केल्याने अाजूबाजूचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही मिनिटांतच एका खासगी मारुती व्हॅनमध्ये तिला टाकून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. परंतु, घटनास्थळावरच तिची कुठलीही हालचाल हाेत नसली तरी ती वाचू शकते या अाशेने तिला रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासताच तिला मृत घाेषित केले. या घटनेची माहिती काजलच्या मित्रमैत्रिणी कुटुंबीयांना कळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच अाक्राेश केला. 
 
हळव्या काजलच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का : अतिशय हळवी अाणि मनमाेकळ्या स्वभावाची काजल असे पाऊल उचलेल असे कधी वाटले नाही. दहावीत ६४ टक्के गुणांनी उत्तीर्ण हाेत तिने व्ही. एन. नाईक महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला हाेता. बारावीत शिक्षण घेणारी काजल काॅलेजला नियमित नसली तरी परीक्षा, प्रात्यक्षिक, विशेष तासिकांना अावर्जून उपस्थित रहात हाेती. तिने इंग्रजीचा अाजचा पेपरही व्यवस्थित दिला हाेता, त्यावरून तिला परीक्षेचा अथवा अभ्यासाचा तणाव नसल्याचे महाविद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षकांनी सांगितले. तरीही तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपविल्याने सर्वांनाच धक्का बसला अाहे. 
 
कुटुंबीयांकडून सखाेल चाैकशीची मागणी : इमारतीवरून उडी मारल्यानंतर खाली पडलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, या प्रकारानंतर अाम्हाला उशिराने कळविल्याचा अाराेप करीत महाविद्यालयात सकाळी वाजेपासून ते ११ वाजेच्या कालावधीत नेमके काय घडले? याचीदेखील महाविद्यालयाकडून कुठलीही माहिती दिली जात नसून या सर्वच प्रकाराची सखाेल चाैकशी पाेलिसांनी करावी, अशी मागणी काजलच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांकडे केली. 
 
अात्महत्येमागचे कारण अस्पष्ट, सर्व बाजूने तपास 
काजलच्या अात्महत्येच्या कारणाचा सर्व बाजूने तपास केला जात अाहे. सुरुवातीला अभ्यासाचा ताणतणाव असल्याचे वाटत हाेते, मात्र प्रत्यक्षात तिच्या मित्रमैत्रिणींशी बाेलल्यावर तसा काही प्रकार दिसून अालेला नाही. त्यापाठाेपाठ ‘ब्लू व्हेल गेम’चाही अंदाज व्यक्त केला जात असला तरी तिचा शेवटचा काॅल काेणाशी झाला, नेमके काय बाेलणे झाले? या बाबींचा शाेध घेतला जाईल. त्यानंतर अात्महत्येचे कारण स्पष्ट हाेईल. 
- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक 

महाविद्यालयातील सर्व परीक्षा रद्द 
विद्यार्थिनीच्याआत्महत्येनंतर महाविद्यालयात घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर महाविद्यालयातील दुपारच्या परीक्षा रद्द करण्यात येऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. 
 
पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज 
विद्यार्थिनीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी तिच्या काही मित्रांची चौकशी सुरू केली आहे. महाविद्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून सर्वच पातळीवर तपास सुरू केला अाहे. सुरक्षारक्षकासह तिच्यासाेबत कॅन्टीनमध्ये असलेल्या मित्रांचे जबाब घेतले जात अाहेत. 
 
जिल्हा रुग्णालय, महाविद्यालयात तणाव 
काजलच्याअात्महत्येनंतर जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या तिच्या कुटुंबीयांतील काहींनी अाक्रमक हाेत महाविद्यालयाच्या शिक्षकांवर अाराेप करीत, ‘त्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर ती वाचली असती’, असे म्हणत अारडाअाेरड केली. त्याचवेळी एकाने संतप्त हाेऊन रुग्णालयातील काचही फाेडल्याने तणाव निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन रुग्णालयातील अाराेग्यव्यवस्थेचा अाढावा घेत असतानाच हा प्रकार घडल्याने पाेलिस अाणि रुग्णालय प्रशासनाची पळापळ हाेऊन काच फाेडणाऱ्याला ताब्यात घेत बंदाेबस्त लावण्यात अाला. महाविद्यालयाच्या अावारातही विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने सरकारवाडा पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. 
 
या क्रमांकावर मिळेल पोलिसांची मदत 
विद्यार्थिनीच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी असून असा कुणाच्याही मनात अात्महत्येचा विचार आला तर क्षणभर थांबून पोलिसांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून एक कॉल करा. तुमच्या मनातील नकारात्मक भावना दूर होण्यास हमखास मदत मिळेल. यासाठी पोलिसांच्या ९७६२१००१००, ९७६२२००२००, ०२५३-२३०५२३३- ३४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तुम्हाला कुठल्याही संकटातून सोडविण्यासाठी पोलिस तत्पर आहेत. 
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
संवाद कमी हाेत असल्यामुळेच अात्महत्या, मानसाेपचारतज्ज्ञांचे म्हणणे 
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अात्महत्येच्या घटनांमागे अधिकतर प्रमाणात पालकांचा अापल्या मुलांशी संवादच कमी झाल्याचे दिसून येते. वैयक्तिक कारण असले तरी मुलांमध्ये विशेषता मुलींमध्ये सहनशीलतेचा भागच नसताे. काेणी नाही म्हटले अथवा नकाराला स्वीकारण्याची तयारीच नसल्याने, असे प्रकार घडतात. काेणी चिडून बाेलले, तरी त्यांच्यात कमीपणाची भावना निर्माण हाेते. छाेटासा प्रसंगही अगदी ‘राईचा पहाड’ करून टाकतात.यात पालकांचीही जबाबदारी माेठी असून मुलांचे मित्रमैत्रिणी काेण अाहेत? त्यांच्या सभाेवताली काेण असताे? याची माहिती अवश्य घेतली पाहिजे. संवाद कमी हाेत असल्यामुळेच मुलांमध्ये अशी वेळ येते, की काही घडल्यास माझी बाजू काेण घेणार? अशी भावना निर्माण हाेते. यात सामाजिकीकरण कमी पडते. मुलांना प्रत्येक बाबतीत सहभागी करून घेणे, ते एकलकाेंडे नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे अाहे. लहानपणापासून भावनांना कसा अावर घालावा, हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. पालक छाेट्या-छाेट्या गाेष्टींची अनावश्यक काळजी घेतात. त्याच्यातील सक्षमता कमी हाेऊन अशा प्रसंगांना सामाेरे जाण्यात ते अपयशी ठरतात. प्रत्येक ठिकाणी पालक रहात नाही, त्यामुळे नकारात्मक भावना उचल खाते, त्यातून अात्महत्येसारखे प्रसंग घडतात. 
- डाॅ. जयंत ढाके, मानसाेपचारतज्ज्ञ 
बातम्या आणखी आहेत...