आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीतीच्या आत्महत्येप्रकरणी धागेदोरे नाहीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - छेडछाडीला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याच्या घटनेस तीन दिवस उलटल्यानंतरही सातपूर पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी आमदार नितीन भोसले यांनी जाधव कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सातपूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाकडे तपासाला गती देण्याची मागणी केली.

जाधव संकुल परिसरातील प्रीती जाधव या 20 वर्षीय युवतीने टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून बुधवारी आत्महत्या केली होती. सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांत दुसर्‍यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने विविध संस्था व पक्षाच्या महिलांनी आक्रमक होत टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

शुक्रवारी महिला काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पोवार यांना निवेदन दिले. जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या आमदार भोसले यांनी, ‘संबंधित मुलाचे नाव माहीत असेल व त्याची भीती वाटत असेल तर आम्हाला सांगा, सर्व प्रकारची मदत करू,’ असे आश्वासन दिले. या वेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका उषाताई शेळके, सुरेश भंदुरे, रमेश साळुंके, विजय बुरकुल, अंबादास अहिरे, सागर शेळके आदी होते.