आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीचे फोटो केले ‘पॉर्न वेबसाइट’वर व्हायरल; एमबीएच्या विद्यार्थ्याचे कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : एमबीए काॅलेजात शिक्षण घेणाऱ्या सोबतच्या मैत्रिणीला प्रेमसंबंधांच्या जाळ्यात अडकवत लग्नाचे अामिष दाखवत तिचे अश्लील फोटो पाॅर्न वेबसाइटवर व्हायरल केल्याचा प्रकार नाशकात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पीडित युवतीच्या काही मित्रांनी क्लिप दाखवल्यानंतर तिने तत्काळ सायबर पोलिसांत धाव घेतली असता संशयिताचा बुरखा फाटला. 
नाशकातील एका काॅलेजात एमबीएचे शिक्षण घेणारी पीडित युवतीसोबत इन्स्टाग्राम फेसबुकवर मैत्रीचे जाळे गुंफणाऱ्या संशयित अक्षय श्रीपाद राव (वय २७, रा. शिवायतन बंगला, खोडेनगर, इंदिरानगर) यानेपीडित युवतीला लग्नाचे अामिष देत तिला घरी नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. तिचे विवस्त्र फोटो काढले. या फोटोच्या अाधारे संशयिताने युवतीस ब्लॅकमेल केले. आठ दिवसांपूर्वी पीडित युवतीच्या काही मित्रांनी तिचे फोटो पॉर्न वेबसाइटवर टाकल्याची माहिती दिली. पीडितेने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.
 
 सायबर सेलच्या माध्यमातून संशयिताचा माग काढण्यात आला. आयपी नंबरच्या अाधारे पाॅर्न वेबसाइटवर फोटो व्हायरल करणारा राव असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी खोडेनगर येथून संशयितास अटक केली. त्याच्या लॅपटाॅपमध्ये आणखी काही मुलींचे विवस्त्र फोटो असल्याचे निदर्शनास आले. या अाधारे दहा ते पंधरा मुलींना संशयित ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयितास न्यायालयात हजर करण्यात आले असता. बुधवार (दि. १४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
 
संशयिताच्या लॅपटाॅपमध्ये काही मुलींचे विवस्त्र फोटो मिळाले अाहेत. या मुलींचे फोटो त्याने पॉर्न वेबसाइटवर व्हायरल केले असल्याचा संशय आहे. चौकशीमध्ये पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. -अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे