आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girls Exploitation Case : Suspend Five, Crime Booked On Four

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींचे शोषण प्रकरण : निलंबित पाच , गुन्हा चौघांवरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पेठरोडवरील जय आनंद अनाथ आश्रमातील शोषणप्रकरणी तेथील मुलींनी पाच कर्मचार्‍यांचा नामोल्लेख केलेला असताना प्रत्यक्षात चार कर्मचार्‍यांविरुद्धच गुन्हा दाखल झाल्याने कोणाच्या दबावामुळे हे घडले का, अशी चर्चा आर्शमाशी संबंधित वतरुळात आहे.

संस्थेच्या विश्वस्तांनी पाचही कर्मचार्‍यांना निलंबित केल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले होते. मुलींनी जिल्हा रुग्णालयात दिलेल्या माहितीतही पाच कर्मचार्‍यांची नावे स्पष्ट केली होती. मग त्याच मुलींनी जबाब लिहून देताना पाचऐवजी चारच जणांनी छळ केल्याचे लिहून दिले असेल तर त्यामागे निश्चितच कुणाचा तरी हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे प्रश्न अनुत्तरितच..
* अनाथ आर्शमात मुलीदेखील असताना तेथे नियमाप्रमाणे महिला रेक्टर का नव्हती ?
* तेथे महिला रेक्टर नसल्याचे समाजकल्याण विभागाच्याही निदर्शनास कधी का आले नाही? आले असल्यास त्यांना यापूर्वी नोटीस का दिली गेली नाही ?

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा इशारा
मुलींवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा पोलिसांना निवेदनाद्वारे देण्यात आला. जिल्हाध्यक्ष दीपक वाघ, युवराज सहाणे, किरण जगझाप, गणेश खेडेकर, कपिल कुमावत, प्रदीप राऊत आदींनी पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांच्याकडे या संदर्भात निवेदन दिले.