आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनीही लुटला "क्लासिकल अानंद'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकाहूनएक सरस गाड्या... जुन्यात जुनी मॉडेल्स.. कडक आवाज... अशी शानदार सवारी पाहण्यासाठी वाहनप्रेमींनी रविवारी एकच गर्दी केली होती. या अनोख्या उपक्रमात ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत मोठ्या उत्साहात नाशिककरांनी वर्ल्ड जावा डे साजरा केला.

गंगापूररोडवरील डाॅन बॉस्को शाळेसमाेर नाशिक जावा-येझदी क्लबच्या वतीने चार वर्षांपासून १२ जुलैला "वर्ल्ड जावा डे' माेठ्या उत्साहात साजरा करण्यात येताे. यानिमित्त दुर्मिळ जावा-येझदी गाड्यांचे प्रदर्शन भरवण्यात अाले अाहे. या प्रदर्शनाचे उद््घाटन रविवारी पाेलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले.

जावा-येझदी गाड्यांची एकेकाळी तरुणांसह माेठ्यांमध्येही एक अागळीच क्रेझ हाेती. मात्र, काळाच्या अाेघात नवनवीन कंपन्यांची वाहने बाजारपेठेत दाखल झाली. त्यामुळे जावा अाणि येझदी हळूहळू कालबाह्य होत गेल्या. या गाड्यांना त्यांचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी नाशिकमधील तरुणांनी एकत्र येत नाशिक जावा येझदी क्लबची स्थापना केली. या क्लबच्या सदस्यांकडून देशभरातील कालबाह्य झालेल्या जावा येझदी गाड्यांचा शाेध घेण्यात येऊन त्या खरेदी करत त्यांचे जतन केले जाते. या गाड्या दरवर्षी प्रदर्शनात मांडण्यात येतात.

125 - विविध जावा-येझदी गाड्या प्रदर्शनातून एकाच ठिकाणी पाहिल्या नाशिककरांनी.
250 - सीसी जावा येझदी गाड्या सादर करण्यात आल्या आहेत प्रदर्शनात.
1960- मधील दुर्मिळ जावा- येझदी आहे "जावा-येझदी क्लब’चे अध्यक्ष विनय चुंभळे यांच्याकडे.

झेकाेस्लाेव्हाकियातून अाणले स्पेअर पार्ट
नाशिकजावा-येझदी क्लबचे अध्यक्ष विनय चुंभळे यांच्याकडे १९६० मधील दुर्मिळ जावा-येझदी २५० सीसी गाडी अाहे. मात्र, पेट्राेल टँकला लाॅक नसल्याने त्यांना ती गाडी वापरता येत नव्हती. यासाठी त्यांनी देशभरात या लाॅकचा शाेध घेतला. शेवटी झेेकाेस्लाेव्हाकिया देशातील पराग गावात हे लाॅक असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तेथून चुंभळे यांनी ते लाॅक मागवून घेत अखेर गाडी रस्त्यावर आणली.

प्रदर्शनात दुर्मिळ गाड्या पाहण्याची संधी मिळणार असल्याने तरुणींनीदेखील प्रदर्शनाच्या ठिकाणी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. यातील काही तरुणींना जावा -येझदी चालविण्याचा माेह अावरता अाला नाही आणि त्यांनी मनसोक्त या गाड्या चालविण्याचा अानंद लुटला.

दुर्मिळ गाड्यांचे अाकर्षण खास
नाशिकजावा-येझदी क्लबच्या वतीने अायाेजित या प्रदर्शनात यंदा सीझेड, जावा आणि येझदी कंपनीच्या दुर्मिळ गाड्या सादर करण्यात अाल्या अाहेत. १९६० मधील जावा २५० सीसी यंदाच्या प्रदर्शनाचे खास अाकर्षण ठरत असून, या प्रदर्शनाच्या निमित्ताने नाशिककर वाहनप्रेमींना एकाच ठिकाणी १२५ गाड्या पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.