आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा खून, संशयिताविरुध्‍द गुन्‍हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नेपाळमधून पळवून आणलेल्या प्रेयसीचा चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी तरुणाने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना आडगाव पोलिसांनी उघडकीस आणली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टला आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या लक्ष्मी अमर साउद (१९, रा. रामांजनेय मंदिर, कैलासनगर, आैरंगाबादरोड) हिचा तपास करीत असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, उपनिरीक्षक प्रवीण माळी, हवालदार संपत लोहकरे यांना घातपाताचा संशय अाला. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता मृत महिलेचा गळा आवळून खून झाला असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. मृत महिलेचा भाऊ महासिंग जगत बोहरा (२९, नेपाळ) याला त्यांनी ही माहिती दिली. बोहरा यांनी आडगाव पोलिस ठाण्यात येऊन अमर उदय साउंद (२२, रा. चौमाला झिल, नेपाळ) याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
बोहरा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, लक्ष्मीला अमरने नोव्हेंबरमध्ये नेपाळमधून पळवून सुरत नाशिकला आणले. त्याच्याशी विवाह केल्याचे तिने आई-वडील नातेवाइकांना सांगितले होते. त्यामुळे तिचे शोधकार्य आम्ही थांबवले होते. अमर लक्ष्मी आैरंगाबादरोडवर वॉचमन रूममध्ये रहात होते. ऑगस्टला अमरनेे चारित्र्याच्या संशयावरून लक्ष्मीचा दोरीने गळा खून केल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता लक्षात आले. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...