आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत शाळांच्या आवारात टवाळखोरांचे अड्डे, पालकांची कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोत एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतील दहावीच्या मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार घडला. या अतिशय गंभीर प्रकरणाचे वेगवेगळे पडसाद उमटले अाहेत. इतक्या संवेदनशील गंभीर प्रकारानंतर पोलिस प्रशासनाने किंवा शाळा प्रशासनाने काय काळजी घेतली? काय धडा घेतला? त्या ठिकाणचे वातावरण कसे होते? याबाबत माहिती घेणारा ‘दिव्य मराठी’चा हा लाइव्ह रिपोर्ट...

वेळ सकाळी ११ वाजेची...शाळेच्या सकाळच्या सत्रातील वर्ग दुपारी १२.३० वाजता सुटतात. शाळा इंग्रजी माध्यमाची असून, येथे शिक्षण घेणारी मुले बहुतांश श्रीमंतांचीच. ही मुले उच्चशिक्षण घेण्यासाठीच्या दृष्टीने हुशार समजली जातात. मात्र, बदललेली परिस्थिती पाहता अतिशय धक्कादायक वास्तव नजरेत पडले. बलात्काराच्या घटनेमुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. शाळेबाहेर पालकांची गर्दी दिसली. मात्र, गेटवर ज्या पद्धतीने शिपाई किंवा सुरक्षारक्षकांनी शिस्त लावायला हवी किंवा विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने बाहेर जाऊ द्यायला हवे, असे दिसले नाही. एकंदरीतच शाळेत शिस्त काही दिसली नाही.

या शाळेबाहेर टवाळखोरांचा जणू अड्डा बनल्याचा गंभीर प्रकार समोर आला. भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसवून टवाळखोर युवक फिरत असतात. येथे थांबून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरू असतात. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारात गुंडगिरी दिसून येते. कुणीही या प्रकाराला विरोध केला तर त्यांना शिवीगाळ मारहाण करण्याचा प्रकार घडतो.

पोलिसदादा गेले कुठे?
सिडकोतीलया शाळेव्यतिरिक्त अनेक शाळांच्या आवारात गैरप्रकार दिसून आले. मात्र, कोणत्याही ठिकाणी शालेय वेळेत पोलिस गस्त दिसून आली नाही. त्यामुळे गुंडांना वाव मिळतो आहे. बीटमार्शल किंवा पोलिस पथकाने गस्त घालावी, अशी मागणी होत आहे. केवळ मुलींचीच नाही तर महिलांचीही छेडखानी होत असल्याचे निदर्शनास आले. उत्तमनगर येथे रिक्षाचालक मुली महिलांना त्रास देत असल्याचेही निदर्शनास आले. मात्र, सर्व घटनेत ‘पोलिसदादा गेले कुठे?’ हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.
बातम्या आणखी आहेत...