आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेत १०% वाटा द्या : मित्रपक्ष; पावसाळ्यापूर्वी विस्तारात स्थान देऊ : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनानुसार सत्तेत १० टक्के वाटा द्या; अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड इशाराच सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांनी शनिवारी सरकारला दिला. घटकपक्षांची आक्रमकता पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी त्यांची बैठक घेतली. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यात मित्रपक्षांना सामावून घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
केंद्रीय नेतृत्वाशी यावर चर्चा सुरू असून, हिरवा कंदील मिळताच मित्रपक्षांना स्थान देऊ, असेही ते म्हणाले. तथापि, मित्रपक्षांतील या अवकाळी अस्वस्थतेमागे वेगळी कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप शिवसंग्राम संघटना या मित्रपक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन हा इशारा दिला.

जिल्हा बँकांत काय झाले
नगर: विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपशी संधान बांधून बाळासाहेब थोरातांची सत्ता पालटवण्याचा डाव रचला होता.
बीड: भाजपच्यापंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर यांची युती होती.
उस्मानाबाद: भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते, तर काँग्रेस शिवसेना एकत्र होते.
मित्रपक्षांना काय हवे
१.चार जणांना मंत्रिपदे २. विविध महामंडळे, शासकीय समित्यांत योग्य ते प्रतिनिधित्व
भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे मित्रपक्ष शिवसेनेनेही कधी उघड टीका केली, तर कधी डावपेच खेळले आहेत.

गाऱ्हाणी अशी : १.सत्ता असूनही मतदारसंघांत कामे होत नाहीत. २. केंद्र राज्याचा विकासनिधी मिळत नाही.
राज्यात सत्ता आली, पण या सत्तेचा काहीही लाभ मित्रपक्ष म्हणून आम्हाला झाला नाही. -विनायक मेटे, अध्यक्ष
शिवसंग्राम संघटना सत्तेसाठी आम्ही दबाव टाकतो आहोत, अशी टीका होते. पण, तुमचा अट्टहासही सत्तेसाठीच आहे ना? -महादेव जानकर, रासप
आपसातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीतील सहाही घटकपक्षांच्या प्रतिनिधींची एक समन्वय समिती नेमावी. -राजू शेट्टी, स्वाभिमानीशेतकरी संघटना
सरकारविरोधी भूमिका नाही. मात्र, भाजपने दिलेली लेखी आश्वासने पाळावीत. यासाठी डेडलाइन देत नाहीत. सरकारला लाइफलाइन देण्याचा आमचा विचार आहे. रामदासआठवले, रिपाइं
समन्वयासाठी समिती : महायुतीतीलपक्षांचा समन्वय राखण्यासाठी लवकरच सहाही पक्षांची समन्वय समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
लहान मुले बोलतात, त्यावर बोलत नाही - पवारांचा चव्हाणांना टोला
लहानमुले काय बोलतात, त्यावर मी फारसे बोलत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनी वक्तव्य केले असते तर प्रतिक्रियेचा प्रश्न येतो. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर काय बोलू? असा उपरोधिक सवाल करतानाच विरोधी पक्षनेत्यांनी भाजप, शिवसेनेला सोबत घेऊन नगर बँकेची निवडणूक का लढवली, याची माहिती त्यांनी घ्यावी आणि मग बोलावे, असा टोला पवारांनी लगावला.
बातम्या आणखी आहेत...