आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज द्या, अन्यथा बँकेला कुलूप ठाेकू; नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, एमडींना इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक जिल्हा बँकेने परिपत्रक काढून शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचे अावाहन केले हाेते. तसेच परतफेड करणाऱ्या  शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज दिले जाईल, असे अावाहनही केले हाेते. मात्र कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जात नसल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त हाेत अाहे.
 
बुधवारी नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी साेसायटी संघटनेच्या नेतृत्वाखाली साेसायट्यांचे चेअरमन, संचालक यांनी जिल्हा बँकेचे मुख्यालय गाठत चेअरमन नरेंद्र दराडे अाणि व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिरसाठ यांना धारेवर धरले. २५ एप्रिलपर्यंत  कर्ज मिळाले नाही तर बँकेचे संचालक, अधिकारी यांना बँकेची पायरी चढू देणार नाही, बँकेला टाळे लावू, असा इशाराही या वेळी देण्यात अाला.  

बुधवारी नाशिक तालुका, निफाड तालुक्यातील साेसायट्यांचे चेअरमन, पदाधिकाऱ्यांनी बँकेचे मुख्यालय गाठले. त्यांनी व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करण्याची मागणी केली. त्यानुसार व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिरसाठ अाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. चालू वर्षाकरिता शेतकऱ्यांना कर्ज देण्याची मागणी केली गेली. 
बातम्या आणखी आहेत...