आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Citizens Undelay Service Transport Commissioner Zagade Order To RTO

जनतेला विनाविलंब, शुल्कानुसारच सेवा द्या- परिवहन आयुक्त झगडेंचे आरटीओंना आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘जनतेला विनाविलंब, विनासायास आणि शासकीय शुल्कापेक्षा एक रुपयाही जास्त न घेता सेवा द्या’, असे निर्देश परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिका-यांना दिले आहेत.

१९ जानेवारीपासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये दलालमुक्त करण्याचा आदेश झगडेंनी काढला आहे. मात्र, त्यानंतर बहुतांश कार्यालयांमध्ये परवान्यासाठीचे व इतर कामकाजाचे अर्ज उपलब्ध नसणे, निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारणे, अर्जदारांना सहकार्य न करणे असे प्रकार हाेत असल्याचे अनुभव वाहनधारकांना येत आहेत. त्यामुळे एजंटच बरे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर झगडेंनी बुधवारी हे आदेश दिले आहेत.
कोणत्याही दबावाला बळी न पडता आपण जनतेला थेट सेवा विनाविलंब, विनासायास आणि निर्धारित शुल्कापेक्षा एकही रुपया जास्त न घेता अखंडितपणे चालू ठेवावी, असे आवाहन करतानाच आपण कायमस्वरूपी या प्रक्रियेबाबत माहिती घेत असल्याचेही झगडे यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे पत्रात ?
राज्यातील जनतेला विहित केलेल्या शासकीय शुल्कामध्येच सेवा देणे ही आपल्या सर्वांवर कायद्याने टाकलेली जबाबदारी आहे. विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम जनतेला द्यावी लागत असेल तर ती जनतेची आर्थिक पिळवणूक असून संसदेने आपल्यावर कायद्याने टाकलेली जबाबदारी झटकण्यासारखे आहे. याचबरोबर ही बाब भ्रष्टाचाराला प्राेत्साहन देणारीही आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत जनतेची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आर्थिक पिळवणूक होणार नाही हे निरंतरपणे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे झगडे यांनी या पत्रात म्हटले आहे.