आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली पिनहोल शस्त्रक्रिया ‘संदर्भ’मध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विभागीय संदर्भसेवा रुग्णालयातील हृदयरोग विभागातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी एकच किडनी आणि फुप्फुस असणाऱ्या सहा वर्षांच्या बालकास पीनहोल हृदय शस्त्रक्रियेद्वारे जीवनदान दिले. महाराष्ट्राभरातील रुग्णालयात नाकारलेली अतिशय गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी करण्यात आल्याने संदर्भ सेवा रुग्णालय ही शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे.
लहान मुलांच्या शस्त्रक्रिया मोठ्यांपेक्षा जास्त आव्हानात्मक असतात. तसेच त्यांच्यात
भूलप्रक्रिया देखील कठीण असते. मात्र, पीनहोल प्रक्रियेद्वारे जास्तीत जास्त बालकांना निरोगी हृदय देणे शक्य होत आहे. एक किडनी फुप्फुसाच्या सहा वर्षांच्या बालकास पीनहोल करणे अवघड असते.
परंतु हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलकर्णी कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. नामपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली हे आव्हान स्वीकारले. भूलतज्ज्ञ डॉ. कुंवर डॉ. गौरव कुलकर्णी यांनी यशस्वीपणे रुग्णांना भूल दिली. तसेच अत्यंत कौशल्याने डॉ. अतुल पाटील यांनी PINHOLE, PDA DEVICE CLOSURE पार पाडले.

डॉ. पाटील यांनी एकच किडनी फुप्फुस असणाऱ्या बालकास पीनहोल हृदय शस्त्रक्रियेद्वारे जीवनदान दिले. तसेच संदर्भ सेवा रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांत डॉ. पाटील यांनी पीनहोल हृदय शस्त्रक्रिया (PINHOLE) अनेक बालकांवर केल्या असून, ते सर्व यशस्वी झाले आहेत. त्यांनी केलेल्या या अतिशय गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेबद्दल त्यांचे सर्वच स्तरांवर अभिनंदन केले जात आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेमार्फत अनेकांना लाभ
संदर्भसेवा रुग्णालयात सुमारे आठ हजार जणांनी उपचार घेतले. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर उपचाराच्या मोबदल्यात विमा कंपनीने आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बहुतांश रुग्णांमध्ये हाडाशी निगडित रुग्ण आणि कॅन्सरग्रस्त असलेल्यांचा समावेश अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत क्लेम मंजुरीसाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे समोर आले होते. मात्र, ही अडचण दूर करत, आता उपचारासाठी विमा कंपनीकडून तत्काळ क्लेम मंजूर केले जातात. गेल्या वर्षभरात एकट्या संदर्भ रुग्णालयात आठ हजारांहून अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभले...
- गेल्या सहा महिन्यांत विभागातील अनेक बालकांवर पीनहोल यशस्वी केली आहे. एकच किडनी फुप्फुस असणाऱ्या सहा वर्षांच्या बालकास पीनहोल हृदय शस्त्रक्रियेला महाराष्ट्राभरातील रुग्णालयांनी नकार दिला होता. अशी शस्त्रक्रिया वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.
डॉ. अतुल पाटील, हृदयरोगतज्ज्ञ, संदर्भ सेवा रुग्णालय
बातम्या आणखी आहेत...