नाशिक - लग्नपत्रिका वाटण्यासाठी करावी लागणारी दगदग, वेळेचा हाेणारा अपव्यय आणि त्यातच काेणापर्यंत पत्रिका पाेहोचविणे राहून गेल्यावर वाढून ठेवलेले रुसवे-फुगवे... या बाबी टाळण्यासाठी नाशिककरांनी साेशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. लग्नाच्या निमंत्रणाची व्हिडिआे क्लिप तयार करून देण्याचा नवा व्यवसाय उदयास आला असून, व्हाॅट्सअॅपसारख्या माध्यमातून या क्लिपचा प्रसार करणे साेपे जात आहे. छाेटेखानी चित्रपटासारख्या असलेल्या या चित्रफितींमुळे लग्नघरातील व्यक्तींच्या वेळेसह कागदाचीही माेठी बचत हाेत आहे.
सिंहस्थ काळात लग्नमुहूर्त नसल्यामुळे आता सीझनच्या शेवटच्या टप्प्यात माेठ्या प्रमाणात विवाह समारंभांचे आयाेजन करण्यात येत आहे. यात बरेचसे विवाह एेनवेळेला ठरत असल्यामुळे समारंभाच्या नियाेजनासाठी वधू-वराच्या कुटुंबीयांना पुरेसा कालावधी मिळताना दिसत नाही. एकीकडे लग्न विनाविघ्न पार पाडण्याचा तणाव संबंधित कुटुंबीयांवर असताना, दुसरीकडे लग्नाचे निमंत्रणही वेळेवर पाेहोचविण्याचे टेन्शन या कुटुंबीयांवर असते. ही दगदग कमी करण्यासाठी आता साेशल मीडियाचा प्रभावी वापर हाेताना दिसत आहे. आजवर लग्नपत्रिका व्हाॅट्सअॅप आणि साेशल मीडियावर टाकण्याचा ट्रेण्ड हाेता. आता त्यात बदल झाला असून, निमंत्रणे आकर्षक व्हिडिआे क्लिप्सद्वारे दिली जात आहेत. या क्लिप्सच्या निमित्ताने अनेक तरुणांना राेजगारदेखील उपलब्ध हाेत आहे.
पुढे वाचा... काय असते क्लिपमध्ये