आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ग्लोबल कुंभ चॅलेंज' परिषदेस उत्साहात प्रारंभ, २३० इनोव्हेर्टसचा सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. सिंहस्थासाठी शासकीय स्तरावरून पायाभूत सुविधा पुरविण्याचे कामही सुरू आहे. कुंभमेळा एक आव्हान असले, तरी ती एक संधी असून, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टेक-आर्ट-पब्लिक (टॅप)द्वारे त्यात सुलभता आणण्यासाठी विविध उपाय योजले जाऊ शकतात. त्यासाठी इनोव्हेर्टसकडून वेगवेगळ्या अडचणींवर नावीन्यपूर्ण कल्पना जाणून घेत, टेक्नोसॅव्ही कुंभमेळ्याचा श्रीगणेशा ‘कुंभथॉन’ प्रकल्पातून करण्यात आला.

सिम्बाॅयोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये हा ‘कुंभथॉन-४’ या "ग्लोबल कुंभ चॅलेंज इनोव्हेशन्स फॉर पॉप-अप सिटी' या परिषदेस प्रारंभ झाला. या उपक्रमात जगभरातील २३० नामवंत उद्योजक, शास्त्रज्ञ इनोव्हेटर्स सहभागी झाले आहेत. ‘कुंभथॉन’चे प्रमुख सुनील खांडबहाले, सिम्बाॅयोसिस मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. वंदना सोनवणे, अमित बोरा, संदीप शिंदे, अश्विन कंदोई, महेश गुजराथी, गिरीश पगारे, डॉ. आदिती मिशाल यांच्या उपस्थितीत उद््घाटन झाले.

अश्विन कंदोई यांनी उपस्थितांना कुंभमेळा आणि नाशिकविषयी माहिती दिली. कुंभमेळा यशस्वी पार पाडण्यासाठी टेक्नोलॉजीचा अधिकाधिक वापर कसा करून घेतला जाईल, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘कुंभथॉन’ टीमचे संदीप शिंदे यांनी ‘कुंभथॉन’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश स्पष्ट करून सांगितला. कुंभमेळा एक आव्हान असल्याने त्यात नवीन टेक्नोलॉजीच्या माध्यमातून कशी सुलभता आणता येईल, यावर उपस्थिती तज्ज्ञांनी चर्चा केली. या परिषदेतील विविध विषयांवरील चर्चेमुळे संबंधित क्षेत्रांतून समाधान व्यक्त होत आहे.

जगभरातून उपस्थिती
‘कुंभथॉन’मध्येअमेरिका इतर देश, तसेच एमआयटीसह मुंबई, राजस्थान दिल्ली येथील आयआयटीमधील इनोव्हेर्टस त्याचप्रमाणे बेंगळुरूसह जगभरातील सुमारे २३० उद्योजक इनोव्हेर्टस सहभागी झालेले आहेत.

बेंगळुरूच्या वर्क बेन्च प्रकल्पाच्या प्रमुख अनुपमा प्रकाश यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे, आपत्ती व्यवस्थापनात काय खबरदारी घ्यावी, याबाबत टेक-आर्ट-पब्लिक (टॅप)विषयी मार्गदर्शन केले. आंत्रप्रिन्युअर विषयावर प्रदीप यांनी आयडिया टू मार्केट याविषयी मार्गदर्शन केले. गुगलचे प्रमुख प्रज्योत मानिकर आर्या पडते यांनी अॅण्ड्राॅईड अॅप्लिकेशन निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली.