आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्लाेबल प्लॅटफाॅर्म’वरही नाशिकचे बाप्पा विराजमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लाडकेबाप्पा घराेघरी अाणि सार्वजनिक मंडळात विराजमान झालेले असताना फेसबुकसारख्या ग्लाेबल प्लॅटफाॅर्मवरही अाता बाप्पाचीच हवा अाहे. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, नाशिकमधील अनेक मंडळांनी अापले स्वतंत्र पेज तयार केले असून, त्यावर संपूर्ण जगाला अापल्या बाप्पाचे दर्शन घडवले जात अाहे.
गणेशाेत्सवाला सुरुवात झाल्यानंतर रात्रीच्या वेळी पावले वळतात ती सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांची अारास बघण्यासाठी. मात्र, पाऊस वा अन्य काही कारणांस्तव अनेकांना ते शक्य हाेत नाही. अशा गणेशभक्तांसाठी सार्वजनिक मंडळांनी यंदा फेसबुक पेजेस तयार केली अाहेत. अनेकांनी स्वतंत्र अकाउंट तयार करून त्यावर अापल्या मंडळाचे छायाचित्र पाेस्ट करण्याचा सपाटा लावला अाहे.
नवसाला पावणारा गणपती म्हणून लाैकिक असलेल्या अानंदवली येथील नवश्या गणपतीचेही स्वतंत्र अकाउंट अाहे. त्यावर नवश्या गणपतीची अारती, दर्शनाची गर्दी, पालखी साेहळा
अादींविषयीची माहिती पाेस्ट केली जाते. अाेम साईराम मित्रमंडळाच्या ‘सातपूरचा राजा’चेदेखील स्वतंत्र पेज असून, त्यावर सातपूरच्या राजाच्या विविध छटा, अारतीचे फाेटाे, दर्शनासाठीची गर्दी अादी फाेटाे नियमितपणे पाेस्ट केले जातात. बहुतांश मंडळांच्या फेसबुक अकाउंंट अथवा पेजवर गणपतीच्या अारत्या, छायाचित्रे, गणपतीची गाणी अाहेत. गणपतींच्या गाण्यांचे अल्बम, अारती संग्रह अाणि गणपतीच्या फाेटाेंचे वाॅलपेपरही या प्राेफाइलवर दिसत अाहेत.

मधली हाेळी तालीम संघ, अाेम बजरंग ग्रुप भद्रकाली, मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळ, शिवगर्जना प्रतिष्ठान (जुने नाशिक), साईसेवक मित्रमंडळ (जुने नाशिक), सरदार चाैक मित्रमंडळ, माेरया मित्रमंडळ (जुने नाशिक), अमरज्याेत मित्रमंडळ (सातपूर), सिध्दिविनायक मित्रमंडळ (पंचवटी), अाेम साईराम मित्रमंडळाचा सातपूरचा राजा, युवक मित्रमंडळ (मुंबई नाका), प्रेरणा मित्रमंडळ, वृंदावन मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, शिवांजली मित्रमंडळ (कामटवाडे), नवरंग मित्रमंडळ (गांधीनगर), साईबाबा मित्रमंडळ (अशाेक स्तंभ), बालगाेपाळ मित्रमंडळ, रायगड युवक मित्रमंडळ, गजराज मित्रमंडळ,

बजरंग मित्रमंडळ, अर्जुन कला, क्रीडा मंडळ (द्वारका), माेरया मित्रमंडळ (जुने नाशिक), श्रीरामनगर मित्रमंडळ, शिवगर्जना मित्रमंडळ, अापलं मित्रमंडळ (अानंदवली), नवीन नाशिक मित्रमंडळ, माेरया मित्रमंडळ (जुने नाशिक), एकता मित्रमंडळ, शिवराज युवक प्रतिष्ठान मेनराेड, सिद्धांत मित्रमंडळ, गुरुदत्त मित्रमंडळ (पंचवटी)