आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक प्रकल्पांसाठी महापालिकेला दरवाजे खुले, 'ब' दर्जा मिळाल्याने अच्छे दिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आर्थिक डबघाईस आलेल्या महापालिकेला राज्य शासनाने 'ब' श्रेणीत पदोन्नती दिल्यामुळे आता जागतिक बँकेबरोबरच याच स्तरावरील मोठ्या प्रकल्पांसाठीही कर्ज घेण्यासाठीचे दरवाजे पालिकेला खुले होणार आहेत. एवढेच नव्हे, तर केंद्र व राज्य शासनाच्या नवीन योजना तसेच त्या अनुषंगाने वाढीव निधीही मिळणार असून, पालिकेला खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत.
नाशिक महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून, निधीअभावी महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. सद्यस्थितीतील प्रकल्पांच्या देखभालीसाठी पैसा नसल्यामुळे खासगीकरणाचा सपाटा लावला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या अत्यावश्यक बाबींसाठी पालीकेकडे जेमतेम तीनशे कोटीच आहे. त्यासाठीहीदेखील ४०० कोटी रुपयांची कर्ज उभारणी केली जात आहे. पालिकेला क्रिसिल रेटिंगप्रमाणे सध्या उणे अ-अ अशी श्रेणी आहे. त्यामुळे चारशे कोटी इतकीच कर्जमर्यादा असून, सद्यस्थितीत त्याहून अधिक कर्ज घेण्यावर निर्बंध आहे. अशा परिस्थितीत 'ब' श्रेणीतील समावेशामुळे पालिकेची पत वाढणार असून, त्यामुळे जागतिक बँकेकडून कमी दराने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. याबरोबरच पालिकेला जागतिकस्तरावर मान्यता असलेले प्रकल्प राबवण्यासाठी स्वतंत्र कर्जही उपलब्ध होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कमी व्याजदरात राष्ट्रीयीकृत बँकेकडून मोठे कर्ज घेण्याची मुभा यापूर्वी ह्यकह्ण वर्गात मोडणाऱ्या महापालिकेला होती. त्यातही त्यांचे व्याजदर दहा ते बारा टक्क्यांपर्यंत होते. आता 'ब' वर्गातील समावेशामुळे कमी व्याजदरात मोठे कर्ज पालिकेला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मोठे प्रकल्प मार्गी लागण्याची
शक्यता आहे.

पुण्याचा अभ्यास करणार
'ब' वर्गात यापूर्वी असलेल्या पुणे महापालिकेचा अभ्यास करून नाशिक महापालिकेला नेमके काय फायदे होतील, याचा अंदाज घेतला जाईल, असे लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेतील आस्थापनेचा अभ्यास सुरू केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे, पालिकेत आता शहर अभियंता, अधीक्षक अभियंता अशी अतिरिक्त पदे मंजूर होऊ शकतील. रस्ते, पाणी, बांधकाम अशा विभागांसाठी स्वतंत्र अधिकारी दिले जातील.
नवीन आकृतीबंधही होणार
नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेतील कर्मचारी आकृतीबंधही नव्याने करावा लागणार असून, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झाली आहे. आकृतीबंध नवीन होत असला तरी ह्यकह्ण व ह्यडह्ण संवर्गातील पदांच्या भरतीसाठी असलेले निर्बंध व यापूर्वीच शासनाने कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्यासाठी दिलेले निर्देश बघता प्रशासनाची तारेवरची कसरत होणार आहे.