आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- जगाला सतावणारे मंदीचे मळभ आता दूर होत असून याचा परिणाम बाजारातही दिसणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सात टक्क्यांपर्यंत खाली आलेला महागाईचा दर आणखी कमी होत जाईल, असा
आशावाद रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे सहायक आर्थिक सल्लागार आशुतोष रारावीकर यांनी बुधवारी केले. नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘निमा बॅँक समिट-2013’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
रारावीकर म्हणाले, जगाला मंदीने ग्रासले होते. जगाच्या अर्थव्यवस्थेतील विकासाचा दर 3.5 टक्के असताना भारताचा विकासदर 5.5 टक्के होता. रिझर्व्ह बॅँकेने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे हा दर राखणे शक्य झाले असून विकासाचा हा दर असाच वाढत राहणार आहे. ज्या महागाईने सर्वसामान्यांना हैराण केले त्या महागाईचा दर डिसेंबरमध्ये सात टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो आणखी कमी होणार आहे. अमेरिकेत मंदीच्या या काळात तब्बल 350 बॅँका बुडाल्या. मात्र, भारतात एकही बॅँक बुडाल्याचे उदाहरण नसून रिझर्व्ह बॅँकेचे धोरण आणि प्रणालीचे हे मोठे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय बॅँकांचे काम उत्तम
15 जानेवारीपर्यंत बॅँकांच्या क्रेडिटमध्ये 16 टक्के वाढ झाली, एनपीएचे प्रमाण 1.5 टक्क्यावर आले. वर्षभरात एक लाख 82 हजार शाखा बॅँकांनी खेड्यात उघडल्या. नवीन धोरणानुसार खासगी संस्थांनाही बॅँका उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जेथे अद्याप बॅँकिंग सेवा पोहोचलेली नाही तेथे सेवा मिळू शकेल. बॅँकांतील स्पर्धेमुळे ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे बॅँकांना सक्षम व्हावे लागेल. ग्राहकांना चांगली सेवा, उत्पादने देत खर्च कमी करून नफा वाढवावा लागेल याकडे रारावीकर यांनी लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.