आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदर्श उपक्रम - गोसेवेसाठी नाही ‘टंचाई’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - भाकड, आजारी, लंगड्या, पांगळ्या गायींना आसरा आणि निवारा देण्याचे काम शहरातील चोथवे बंधूनी हाती घेतले आहे. टंचाईमुळे चा-याचा प्रचंड तुटवडा असतानाही त्यांनी 70 गायींचे सुरू ठेवलेले संगोपन, पालनपोषण निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. निरुपयोगी असलेली जनावरे शेतक-यांच्या दावणीलाही चा-यासाठी जड होत असताना चोथवे बंधंनी मात्र, त्यांना जीवनदान देण्याचा वसा हाती घेतला आहे.
‘हंबरुनी वासराले चाटते जवा गाय, तव्हा मले तीचेमंदी दिसते माझी माय...’ अशा रीतीने गोमातेला आईचा उपमा दिली जाते. दूध, शेण, गोमूत्र असे सारे भरभरून देणारी गाय दूध देईनाशी झाली की, तिला कसायाच्या दावणीला बांधले जाते. अशा गोमातांना आधार देण्यासाठी सिन्नरमधील राहुल आणि संजय चोथवे बंधू पुढे सरसावले आहेत. कसायाच्या तावडीतून सोडवलेल्या गायींना आश्रय देण्यासाठी त्यांनी सिन्नर येथे सहा एकरावर स्व:खर्चातून गोशाळा सुरू केली. सध्या येथे 70 गाई गुण्यागोविंदाने जीवन व्यतीत करत आहेत. टंचाईमुळे चारा उपलब्ध नसल्याने दिवसाकाठी दोन हजार रुपयांचा चारा विकत घेऊन जनावरांची भूक भागवली जाते. चारा संपल्याने तालुक्यातील शेतक-यांनी येथे दोन बैल ही आणून घातले असून, कसायाला विकण्यापेक्षा येथे त्यांची ठेप राहील, हा त्यामागचा उद्देश आहे.
वडील स्व. गंगाधर चोथवे यांच्या नावाने स्थापन केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही ‘हरि ओम गोशाळा’ चालविली जाते. तालुक्यातील गावांतील शेतक-यांनी भाकड, आजारी आणि शेवटच्या घटका मोजणा-या गायींना गोशाळेत आणले आहे. या गायींना दिवसांतून एक वेळ हिरवा चारा दिला जातो. तर उर्वरित वेळात कोरडा चारा घातला जातो. सायंकाळी त्यांना चंदी दिली जाते. अनेकांनी दूध देईनाशा झालेल्या, किंवा आजारपणामुळे चारा पाणी तुटलेल्या गायी या गोशाळेत आणून घालत, एकप्रकारे स्वत:ची गोमातेच्या सेवेतून सुटका करून घेतली आहे. मात्र, चोथवे यांनी गोशाळेत दर दिवशी पशुवैद्यकीय डॉक्टरांची एक व्हिजीट निश्चित केली असून, अन्न वर्ज्य केलेल्या जनावरांना पुन्हा चारापाण्याला लावले आहे.
ट्रस्टच्या शेतीचा केवळ चा-यासाठीच वापर
चोथवे यांच्या मालकीच्या सहा एकर जमिनीतील काही भागात गोशाळेसाठी शेडची उभारणी केली आहे. उर्वरित शेतात गार्इंना चारा पिकवला जातो. कापडाचा व्यवसाय सांभाळून सकाळ-संध्याकाळ गायींच्या सहवासात घालवण्याचा चोथवे बंधूंचा दिनक्रम आहे. गायींची निगा राखण्यासाठी दोन जोडप्यांची तेथे व्यवस्था केली आहे. त्यासाठी महिन्याकाठी 15 हजार रुपये मोबदला देण्यात येतो. जनावरांची संख्या वाढल्याने आणि शेतातील चारा संपल्याने संपूर्ण चारा त्यांना विकत घ्यावा लागत असून, त्यासाठी दिवसाला किमान दोन हजार रुपये खर्च येतो.
गोसेवेतून समाधान; शेतक-यांचा प्रतिसाद
४हिंदू धर्म संस्कृतीत गोमातेचे महत्त्व अनमोल आहे. शेतक-यांच्या दावणीला दिसणा-या गार्इंची संख्या दिवसेदिवस कमी होत असल्याचे तसेच गाई कत्तलीसाठी जात असल्याचे शल्य मनाला नेहमीच बोचते. त्यामुळे अशा गोमातेची सेवा करण्याचा निर्धार केला असून, गोशाळेची महती तालुकाभर पसरल्याने शेतकरी अशा गाई गोशाळेत बांधत आहे. त्यामुळे गार्इंचे कत्तलीपासून संरक्षण होते ही बाब समाधानाची आहे.
राहुल व संजय चोथवे, गोशाळा चालक