आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच दिवसातच गोदापार्कच्या कामाला ब्रेक; रिलायन्सकडून डिझाइनमध्ये बदल केल्याचे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज ठाकरे यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने जोमाने सुरू झालेले गोदापार्कचे काम गेल्या तीन दिवसांपासून बंद पडले असून, रिलायन्सने नेमलेल्या अर्किटेक्ट समूहाने पार्कच्या डिझाइनमध्ये बदल केल्याचे त्यामागचे कारण सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गोदापार्ककडे बघितले जात आहे. फेब्रुवारीत भूमिपूजन झाल्यानंतर गोदापार्कचे काम सुरू झालेले नव्हते. दरम्यान, नाशिक मॉडेलचा डंका पिटून राज्याचे लक्ष वेधण्यासाठी सक्रिय झालेल्या राज यांनी गुरुवारी नाशिक दौरा केला. या वेळी दुपारी आल्यानंतर सर्वप्रथम ठाकरे यांनी गोदापार्कची पाहणी केली होती. त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आसारामबापू पुलालगत गोदापार्कचे कामही सुरू झाले होते. दोन मोठे जेसीबी लावून नदीपात्रालगत जमीन सपाटीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी राज यांनी महत्त्वाच्या सूचनाही दिल्या होत्या. या दौर्‍याचे फोटो छापून आल्यानंतर अनेक हौशी नाशिककर पाहणीसाठी येत आहेत. मात्र, ठाकरे यांचा दौरा संपला नाही तोच, गोदापार्कच्या या कामाला ब्रेक लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे काम पूर्णत: बंद झाले असून, काही यंत्रसामुग्रीही हलवण्यात आली आहे. सद्यस्थितीत एक जेसीबी व एक ट्रॅक्टर या जागेवर आहे. यामुळे येथे येणार्‍यांना काम ठप्प पडल्याचे निदर्शनास येत आहे. या वेगाने काम सुरू राहिल्यास आधीच राज यांनी पहिल्या टप्प्याला एक वर्ष लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्या आधारावर चार टप्प्यांसाठी चार वर्षे लागतील, असा निष्कर्षही काढला गेला.
असा आहे पहिला टप्पा
आसारामबापू पुलापासून साडेसातशे मीटरपर्यंत पहिल्या टप्प्यात काम असेल. साडेसात मीटरचा पेव्हर ब्लॉकचा पथ व भोवती दगडी जाळ्यांची संरक्षक भिंत रचून पुराच्या पाण्यापासून गोदापार्कचे संरक्षण केले जाईल.

डिझाइन प्राप्त झाल्यानंतर काम सुरू
४गोदापार्कच्या डिझाइनमध्ये काही बदल होणार आहे. त्यामुळे काम तात्पुरते थांबले असून, रिलायन्स समूहाने नियुक्त केलेल्या आर्किटेक्ट कन्सल्टंटनी सोमवारी पाहणी केली. सुधारित डिझाइन प्राप्त झाले की, तातडीने काम सुरू होईल.
सुनील धामणे, कंत्राटदार