आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godapark News In Marathi, Aap Party Opposition To Godapark, Divya Marathi

गोदापार्कला ‘आप’चा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून खासगीकरणाच्या माध्यमातून गोदापार्क उभारण्यात येत आहे. मात्र, गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आम आदमी पार्टीतर्फे शनिवारी गोदापार्कला विरोध करत रामकुंड परिसरात स्वच्छता करून निषेध नोंदवण्यात आला.

‘प्रदूषणमुक्त गोदावरी हवी, गोदापार्क नको’, ‘गोदावरी स्वच्छ करा, गटार, नाले बंद करा’ अशा घोषणा देत ‘आप’तर्फे गोदापार्कला विरोध करण्यात आला. परिसरात ठिकठिकाणी नाल्यांद्वारे गोदावरीत प्रदूषित पाणी मिसळत असूनही पालिका गोदाप्रदूषण रोखण्यावर भर न देता ठेकेदारांना खूश करण्याच्या मागे असल्याचा आरोपही करण्यात आला.

जितेंद्र भावे, प्रभाकर वायचळे, मुकुंद बेणी, नकुल बोराडे, शैलेंद्र सिंग, जसबीर सिंग, मिलिंद पगार, साहेबराव कदम, सुरेश कोचार, डॉ. अभय सोनवणे, कांचन ढाकणे, मंगला शिंदे, गीता खत्री, रिमा चंडोक आदी उपस्थित होते.