आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषित पाण्याचे घेतले जाते तीर्थ..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदाघाटावरील रामकुंड परिसरातील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. देशभरातून येणारे भाविक र्शद्धेने हे पाणी प्राशन करतात. त्यांना पचनसंस्था आणि मूत्रपिंडाचे आजार जडू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

रामवाडी नाला, चिंचचबनचा नाला, होळकर पुलाखाली बांधलेल्या स्वच्छतागृहाचे पाणी झिरपून गोदापात्रातील बंधार्‍यात जाते. तेथून गांधी तलाव व लक्ष्मणकुंडातून थेट रामकुंडात मिसळते. विविध धार्मिक विधींसाठी रोज येणारे सरासरी 500 लोक येथे निर्माल्य आणि अन्नपदार्थ पाण्यात मिसळतात. वाहने धुताना पेट्रोल, डिझेल, ऑइल तवंग, प्लास्टिकचा कचरा लक्ष्मणकुंडातून रामकुंडात येतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गोदा प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. त्याचा परिणाम देशभरातून येणार्‍या भाविकांच्या आरोग्यावर होत आहे.