आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी शुद्धीकरणाच्या ८० काेटी रुपयांचा विसर, सिंहस्थ निधीतील बचत निधी सरकारने अडवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मिशननाशिक’चा नारा देत दाेन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिणगंगा गाेदावरी संवर्धनाचा मुद्दा उचलून नाशिककरांना अाश्वस्त करण्याचा प्रयत्न केला असला तरी, दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शासनाकडे महापालिकेची गाेदावरीशी संबंधित दाेन, तर साधुग्रामच्या संरक्षक कुंपणाचे एक अशा तीन प्रमुख कामांपोटी ८० काेटींचा निधी अडकल्यामुळे अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात बचत केलेल्या निधीतून संबंधित कामे हाती घेण्यात अाली. मध्यंतरी हा निधी मिळेल अशी अपेक्षा हाेती. मात्र, अाता विचारणा केली, तर कधी मुख्यमंत्री, कधी विभागीय अायुक्त वा जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सांगून पालिकेला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियाेजनाचे श्रेय घेण्यावरून राज्यातील युती सरकार तर महापालिकेतील मनसे या दाेघांत चांगलाच कलगीतुरा रंगला हाेता. एकमेकांची खिल्ली उडवताना सिंहस्थ अाम्हीच कसा यशस्वी केला, याबाबत दावे-प्रतिदावेदेखील झाले होते. एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीच्या निमित्ताने अायाेजित मेळाव्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी सिंहस्थ नियाेजनाबाबत स्वतःचीच पाठ थाेपटून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते उपस्थित मंत्र्यांनीही त्यास भरभरून दाद दिली होती.
याच कार्यक्रमात गाेदावरी शुद्धीकरणाची घाेषणा करून अॅक्शन प्लॅन करण्याचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला. महापालिकेने फक्त प्रस्ताव पाठवावा, त्यास तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे अाश्वासन दिले. प्रत्यक्षात अाश्वासनपूर्तीच्या दृष्टीने प्रयत्नच झाले नाहीत. अाता तर सिंहस्थ बचत निधी मिळत नसल्यामुळे गाेदावरीशी संबंधित दाेन महत्त्वाची कामे रखडल्याचे समाेर अाले अाहे. जवळपास ६० काेटींचा बचत निधी राज्य शासनाकडे पडून असल्याने व्याजापाेटी जमा झालेली २७ काेटींची रक्कम असा ८७ काेटींचा निधी महापालिकेला अपेक्षित अाहे. त्यातून गाेदावरी प्रदूषण थांबविण्यासाठी ४० काेटी खर्चून गंगापूर येथे मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार अाहे. साबरमतीप्रमाणे गाेदावरीचे रुपडे पालटण्यासाठी ४० काेटींची घाटबांधणीही पालिकेला करायची अाहे. या व्यतिरिक्त साधुग्रामच्या महापालिकेच्या ताब्यातील जागेत काेटी रुपये खर्च करून संरक्षक कुंपण बांधायचे अाहे. बचत केलेल्या निधीतून संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली अाहे. अाता उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यापूर्वी विभागीय अायुक्तांची परवानगी गरजेची असली तरी, गेल्या अनेक दिवसांपासून त्याबाबत कधी मुख्यमंत्री, तर कधी स्थानिक पातळीवरील अडचणीचे कारण पुढे करत राज्य सरकार या विषयाला बगल देत असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे अाहे.

असा झाला खर्च
१,१२९ काेटी:सिंहस्थ अाराखडा (महापालिका)
७५ टक्के:उच्चस्तरीय समिती हिस्सा (राज्यशासन)
६८९ काेटी:शासन अनुदान
६२२ काेटी:प्राप्त अनुदान
बातम्या आणखी आहेत...