आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नाशिकचा महापूर अाेसरला, रस्ते खचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला हाेता. त्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले हाेते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बुधवारी गोदावरीचा पूरही ओसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे रामवाडी पूल, चोपडा लॉन्स येथील पुलासह बापू पुलाची प्रचंड दुरवस्था झाली. महापुरामुळे रामवाडी पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या संरक्षित लोखंडी पोल व जाळीची मोडतोड झाली. तर बापू पुलावर खड्डेच खड्डे पडले असून पुरामुळे पुलागतचा रस्ताच वाहून गेला. त्यामुळे बुधवारी या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर चोपडा लॉन्सलगत असलेल्या पुलाच्या प्रवेशद्वाराच खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली.

नाशिक शहरात सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररुपच धारण केले होते. मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुरती दाणादाण उडाली. मुसळधार पाऊस आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने गोदावरीला महापूर आला होता. गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केल्याने बापू पुलासह रामवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला होता. या महापुरामुळे गोदाकाठलगतच्या नागरिकांचे, शहरातील व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले. गोदावरी नदीचा पूर ओसल्यानंतर महापुरामुळे बाधित झालेले विदारक चित्र पाहावयास मिळाले.

रस्ता गेला वाहून : महापुरामुळे गोदावरी नदीवरील बापू पुलागतचा डांबरी रस्ताच वाहून गेला. बापू पुलावर प्रवेश करतानाच रस्ता खचल्याने बुधवारी दिवसभर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी खडी टाकण्याचे काम सुरु होते.
जुन्या कसारा घाटात २० मीटर महामार्ग खचला
इगतपुरी- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात अतिवृष्टीने महामार्ग खचला अाहे. महामार्गाला २० मीटर तडा गेल्याने सिंगल ट्रॅक बंद करण्यात आला आहे. नाशिक मुंबई एक्स्प्रेस वे कंपनीने तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले असले तरी मुसळधार पावसामुळे अनेक अडचणी येत आहेत. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ महामार्ग खचल्याचे एक्स्प्रेस हायवेच्या पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना बुधवारी दुपारी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खचलेल्या रस्त्याची पाहणी करूण सुरक्षेच्या दृष्टीने सिंगल ट्रॅक बंद करण्याच्या सूचना केल्या.
दाेन वर्षांपूर्वीही खचला रस्ता, महिनाभर दुरुस्ती
३१ जुलै २०१४ राेजी कसारा मार्गावर याच ठिकाणी रस्ता खचल्याची घटना घडली होती. भूस्खलनामुळे रस्ता खचल्याचे कंपनीने त्या वेळी स्पष्ट केले होते. पुन्हा १० दिवसांनी ९ ऑगस्ट २०१४ ला रस्ता अधिक खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास एक महिना या दुरुस्तीसाठी लागला होता.
पुढे वाचा...
सप्तशृंग गडाचा रस्ता धोक्यात... हतनूरचे ३६ दरवाजे उघडले; ‘तापी’त विसर्ग... खडकवासला भरल्याने भिडे पूल पाण्याखाली... राधानगरी धरणातून विसर्ग; कोल्हापुरात दक्षतेचा इशारा आणि पाहा नाशिक मधील पुराचे भयावह फोटोज..
बातम्या आणखी आहेत...