आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापार्कची गेली रया; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुठे खड्डे पडलेले,कुठे झाडे पडल्याने पेव्हरब्लॉक उखडलेले आणि संरक्षक भिंत कोसळलेली... हे चित्र आहे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेल्या गोदापार्कचे. मनपाच्या भोंगळ कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेला आहे.
तत्कालीन महापौर दशरथ पाटील आणि त्यावेळी शिवसेनेत असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोदापार्कला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मान्यता देत 2003-2004 साली 6 कोटी रुपये खर्चून 2.60 किमीच्या गोदापार्कची उभारणी केली. फॉरेस्ट नर्सरी ते होळकर पूल, होळकर पूल ते रामवाडी असे दोन्ही बाजूने गोदापार्क आहे. निवांतपणासाठी काही वृद्ध सायंकाळी येथे येतात. पण पार्कची दुरवस्था झाल्याने लोकांचे येणे कमी झाले आहे.
येत्या पालिका निवडणुकीत गोदापार्क हा प्रचाराचा एक मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. आता आसारामबापू आश्रम ते फॉरेस्ट नर्सरी असा 2 कि.मी.चा पार्क उभारण्याचा घाट मनपाने घातला आहे.
काही सांगू शकत नाही - 2003-04 साली माझ्या काळात पार्कची जवळपास अडीचपावणे तीन किमी पार्कची उभारणी झाली होती. त्यासाठी जवळपास 6 कोटी रुपये खर्च झाले होते. आता पार्क माझ्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मी काही सांगू शकत नाही. - राजेश पालवे, तत्कालीन सहायक अभियंता, मनपा
पार्कची झाली बोळ - पार्कवरील झाडांची देखभाल व्यवस्थितपणे केली जात नाही. सरकार दरबारी चालणारी दिरंगाई, हे या मागचे कारण आहे. त्यामुळे ही झाडे अस्ताव्यस्त वाढली असून, ती जॉगिंग ट्रॅकवर पसरली आहेत. त्यामुळे हा ट्रॅक म्हणजे एक बोळ बनला आहे.
निवडणुका संपताच कामाला सुरुवात - गोदापार्कच्या दुरवस्थेची मला कल्पना आहे. त्याबाबत शहर अभियंत्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तसे प्रस्तावही त्यांनी सादर केले आहेत. मात्र, आचारसंहितेमुळे दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली नसून, निवडणुका संपताच त्याचे काम सुरू केले जाईल. - बी. डी. सानप, आयुक्त, मनपा