आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा यांत्रिक पद्धतीने गोदा स्वच्छतेचा घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळा तोंडावर असताना अस्वच्छ गाेदावरीचा मुद्दा तापदायी ठरण्याची भीती लक्षात घेता, प्रशासनाने गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर यांत्रिक पद्धतीने गाेदावरी स्वच्छतेचा घाट घातला आहे. यापूर्वी राेबाेटद्वारे गाेदावरी स्वच्छतेचा प्रयाेग फसल्यानंतर पुन्हा यंत्रावरच स्वच्छतेची भिस्त ठेवण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.

गाेदावरी प्रदूषणाचा मुद्दा उच्च न्यायालयापर्यंत पाेहचला आहे. या पार्श्वभूमीवर गाेदा स्वच्छतेसाठी यंत्राचा वापर करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी साबरमतीच्या धर्तीवरील यंत्रसामग्रीचा वापर हाेणार आहे. त्यासंदर्भात ठेकेदार वा संस्थांकडून यंत्रसामुग्रीचे सादरीकरण अन्य बाबी आयुक्तांसमाेर ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी महापालिका संबंधित संस्था वा ठेकेदारांना बाेलवणार असल्याचे उपायुक्त राेहिदास दाेरपुळकर यांनी सांगितले. राेबाेटमार्फत गाेदावरी स्वच्छतेचा प्रयाेग अयशस्वी ठरला आहे. राेबाेट जास्तीत जास्त सहा फूट पाण्याखाली जात असल्यामुळे तळाकडील निर्माल्य, पाणवेली काढण्यात अपयश आले हाेते.

गेल्या वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या १०३१ लाेकांना चार लाख हजार ९९० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. त्यात पंचवटीत ३५४ जणांना ८६८०० रु., नाशिकराेडला ७९ जणांना ४२००० रु., सातपूरला ४९ जणांना ३४ हजार ५० रु., सिडकाेत ५१८ जणांना दाेन लाख हजार ७९० रु, नाशिक पूर्वमध्ये पाच जणांना नऊ हजार २०० रु., नाशिक पश्चिममधील २४ जणांना २९ हजार ९५० रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला.

कपडे धुण्याबराेबरच निर्माल्यावर बंदी
गाेदापात्रात कपडे धुणार्‍यांबराेबरच निर्माल्य टाकण्यावर बंदी घातली जाणार आहे. दशक्रिया विधीचे निर्माल्य गाेदावरीत टाकू नये, असे भाविकांना समुपदेशनाद्वारे पटवून दिले जाईल, असेही दाेरपुळकर यांनी सांगितले.