आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godavari River News In Marathi, Fish, Nashik Municipal Corporation, Divya Marathi

गोदापात्रातील माशांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरी नदीमध्ये मासे मृत पावल्याच्या घटनेला महिना उलटला असून, अद्यापही या माशांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ न शकल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामगिरीविषयीच शंका उपस्थित केली जात आहे. वर्षभरात आसारामबापू पुलानजीक प्रदूषणामुळे अशा दोन घटना घडल्या आहेत. मात्र, त्याविषयी महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे.
गोदावरी नदीवरील आसारामबापू पुलानजीक बोट क्लब परिसरात गेल्या महिन्यात शेकडो मासे मृत झाल्याची घटना घडली होती. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटल्याने व औद्योगिक वसाहतीतून रसायनमिर्शित पाणी पात्रात सोडले जात असल्यानेच असे प्रकार होत असल्याची बाबही यापूर्वीच निदर्शनास आली आहे. जैविक साखळीचा असमतोल होत असल्याचे या प्रकारांवरून स्पष्ट होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका प्रशासन मात्र जणू काही घडलेच नाही, असे दर्शवित आहेत. याच अनुषंगाने गोदावरी गटारीकरण विरोध मंचच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत वरील दोन्ही संस्थांना प्रतिवादी केले आहे. याबाबत जबाबदार धरत न्यायालयाने यापूर्वीच संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना कार्यवाही होत नसल्याने गोदा प्रदूषणाला अद्याप आळा बसू शकलेला नाही.
नमुने अडकले लालफितीतच
मासे मृत पावले त्याठिकाणाहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचार्‍यांनी पाण्याचे काही नमुने परीक्षणासाठी गोळा केले होते. आता या घटनेला महिना होत आला आहे. मात्र, अद्याप त्याचा अहवाल न आल्याने हे नमुनेच आता सरकारी लालफितीत अडकले आहेत.