आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकच्या विद्यार्थिनी देताहेत गोदा प्रदूषणमुक्तीचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या समस्येवर चाटोरी येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इन्स्पायर अवॉर्डच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अनोखा उपाय सुचविला आहे. नदीपात्रातील पाणवेली काढून तिच्यापासून विविध वस्तू तयार करता येतात हे या विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिकृतीतून दाखविले आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या या प्रतिकृतींचे कौतुक केले जात आहे.

गोदावरी नदी ही गंगापूर गावापासून दूषित होत आहे. शहरालगत नदीपात्रात गटारीचे दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नदीपात्रात पाणवेलींचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी गटारीचे पाणी सोडण्यात आल्याने सोमेश्वरपासून सायखेडा गावापर्यंत नदीपात्रातील मासे जिवंत राहात नाही. ज्या गावांमधून नदी जाते तेथील ग्रामस्थ हेच प्रदूषित पाणी पितात. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब ओळखून या विद्यार्थिनींनी या समस्येवर उपाययोजना शोधली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण व राज्य शासनाच्या नागपूर येथील विज्ञान शिक्षण मंडळ यांच्या वतीने सिडकोत व्ही. एन. नाईक विद्यालय, आर. पी. विद्यालय येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या तीनदिवसीय प्रदर्शनात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून एक प्रतिकृती मांडण्यात आली आहे. प्रदर्शनामध्ये विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक गाव आणि शाळा, शुध्द पाण्यासाठी नवीन उपक्रम, घरगुती औषधे, उघड्यावरील खाद्यपदार्थ सेवनाने होणारा धोका अशा विविध प्रयोगांतून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना धडे देण्यात येत होते.

> नदीची एकूण लांबी : 1 हजार 465 किलोमीटर
> नदीपात्रातील पाण्यात नायट्रोजन, अमोनिया (एनएच 3), मिथेन (सीएच 4) यांचे कमाल प्रमाण आहे.
> बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) 5 पीपीएम असायला हवे, सध्या हे प्रमाण 120 पीपीएमपेक्षा जास्त आहे.
> जलशुध्दीकरण केंद्रातून सोडल्या जाणार्‍या पाण्यात 30 पीपीएम (बीओडी) आढळतो.
> पाणवेलीमुळे पवित्र गोदावरी अस्वच्छ दिसते.