आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदा प्रदूषणाची सद्यस्थिती मांडण्याचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गोदावरी प्रदूषणाबाबत आजपर्यंत दिलेले 13 आदेश एकत्रित करून सध्याची परिस्थिती न्यायालयात मांडण्याचे निर्देश बुधवारी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या गोदावरी गटारीकरण विरोधी मंचला दिले.
गोदावरी प्रदूषणाला आळा बसण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, कृत्रिम अस्थिकुंडाचे निर्माण अशा प्रकारचे 13 आदेश दिले होते. त्या आदेशांची अंमलबजावणी झाली का, असा प्रश्न करून हे सर्व आदेश एकत्रित करून पाहणी करावी व उच्च न्यायालयाला वस्तुस्थिती सांगावी, असे निर्देश राजेश पंडित व निशिकांत पगारे यांना दिले. निरीच्या सर्व अटी मान्य कराव्याच लागतील, असे नाशिक महापालिकेला सुनावतानाच कुंभमेळ्यात प्लॅस्टिकला बंदी करावी काय? तसेच कृत्रिम तलावांचे काय झाले, असा प्रश्नही पालिकेला न्यायालयाने विचारला.