आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीसाठी राहू प्रयत्नशील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आम्ही सदैव गोदावरीचे रक्षण करू.. तिच्या प्रदूषण मुक्तीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू.. तिच्या सौंदर्यात आमचे सौख्य सामावले आहे... 'अशा शब्दांत न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोदावरीकाठी जाऊन शपथ घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचला बरोबर घेऊन साफसफाईदेखील केली.
गोदावरी स्वच्छ ठेवणे हे सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे आणि या कर्तव्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी विधी महाविद्यालयांनी घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. गोदावरी गटारीकरणविरोधी मंचने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन गोदावरीच्या स्वच्छतेच्या कामाला मंगळवारी (दि २) प्रारंभ केला आहे. याच कामाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी रामकुंडापर्यंत रॅली काढली. रामकुंड परिसरात ह्यपर्यावरणाच्या बाजूने संपूर्ण कारकीर्दीत किमान एक तरी खटला विनाशुल्क चालवू, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली व नदीला अर्घ्य दिले. त्यानंतर परिसराची साफसफाई करण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस. बी. सातभाई, प्रा. बबन भालेराव, प्रा. रोहिणी ढिकले, प्रा. जोत्स्ना दिघे, प्रा. बी. जी. कौराणी, विद्यार्थी प्रतिनिधी सागर देशमुख, गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे राजेश पंडित, संदीप भवर, नितीन रुईकर, विद्यार्थी निखिल परदेशी, यश भुजबळ, विक्रांत घोरपडे, माधुरी लोखंडे, प्रतिमा चंद्रमोरे, भावना धोत्रे, सोनिया जाधव आदी उपस्थित होते. ग्रीन कुंभाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविला गेला. माजी महापौर दशरथ पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात.

रामकुंड परिसरात केली स्वच्छता
या वेळी परिसरात अस्ताव्यस्त पडलेले चहाचे कप, पाणवेली, निर्माल्य संकलित करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांबरोबर प्रसिध्द अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री अंजली पाटील यांनी सहभाग घेतला.