आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godavari Various Pier, BOT On Development Proposal

गोदावरीवरील विविध घाट ‘बीअाेटी’वर विकसनाचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थकाळात रामकुंड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील भार कमी करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे ठिकठिकाणी स्वतंत्र रामघाट बांधण्यात अाले आहेत. या घाटांचा उपयाेग तीनही पर्वण्यांमध्ये झाला असला, तरीही पर्वण्यांनंतर या घाटांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. हे घाट ‘बीअाेटी’ तत्त्वावर दिल्यास त्याचा उपयाेग पर्यटनासाठी हाेऊ शकताे, असा प्रस्ताव पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तयार केला अाहे. त्याची अंमलबजावणी झाल्यास नाशकातील पर्यटनस्थळांमध्ये वाढ हाेईलच, शिवाय नाशिककरांनाही विरंगुळ्यासाठी नवीन स्थळे उपलब्ध हाेतील.
गत कुंभमेळ्यातील दुर्घटनेची रमणी आयोगाने दुर्घटनेची चौकशी करून पुन्हा अशा घटना घडू नयेत, याकरिता गोदाघाटावर नवीन घाट विकसित करण्याचे सुचविले हाेते. रामकुंडावरील घाट अरुंद असल्याने शाही पर्वणीप्रसंगी येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठीच्या आराखड्यात गोदाघाटावर घाट बांधणीचे काम प्रस्तावित होते. त्यानुसार एकूण २७४० मीटर लांबीचे घाट बांधण्यात अाले असून, १३८.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. घाटांना समांतर रस्ते, रॅम्प जाेडण्यात अाले अाहेत. हे काम वॉटर बाउंड मेकॅनिक (डब्ल्यूबीएम) तंत्राने केलेले आहे. भाविकांना सहजपणे ये-जा करता यावी, दुर्घटना घडू नये, यावर विशेष भर देण्यात आला आहे. या घाटांवर तीनही पर्वण्यांमध्ये स्नानासाठी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. पर्वणीनंतर मात्र या घाटांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेत अाहे. संबंधित घाट अाहे त्या स्थितीत राहू दिल्यास त्यांचा दुरुपयाेग हाेण्याची दाट शक्यता अाहे. त्याचप्रमाणे त्यांचे साैंदर्यही अल्पावधीत लाेप पावू शकताे. या घाटांचे साैंदर्य अबाधित राहावे म्हणून त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त हाेत अाहे. यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मक दृष्टिकाेन दाखवत ‘बीअाेटी’ तत्त्वावर घाट देखभाल दुरुस्तीसाठी देता येतील, असे सांगितले.

नवीन घाटांना पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असून, स्थानिकांकडून येथे चाैपाटीसारखा वापर झाल्यास बेराेजगारांना राेजगार उपलब्ध हाेणार असल्याने घाटांचे पावित्र्य राखण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज अाहे. नियमित साफसफाईसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायंकाळी ते या वेळेत घाट खुले करावेत. त्यांच्या साेयीसाठी पाणीपुरी, भेळपुरी, दाबेली अादींच्या गाड्या लावण्यास परवानगी असावी. त्या तेथे कायमस्वरूपी नसाव्यात. त्यांना चाके असावीत, जेणेकरून त्या इतर वेळी तेथून हटवता येतील. या गाड्यांवर अंडा-भुर्जी, चायनीज फूड, पावभाजी असे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नयेत. त्यातून मद्यपानासारख्या प्रकारांना अाळा बसण्यात मदत हाेईल. या लहान व्यावसायिकांकडून महापालिकेला करदेखील प्राप्त हाेऊ शकेल.

नवीन पर्यटन स्थळे विकसित हाेतील
संबंधितघाट ‘बीअाेटी’ तत्त्वावर देता येतील. घाटांकडे दुर्लक्ष हाेऊ नये याकरिता ‘बीअाेटी’ची अावश्यकता अाहे. या घाटांवर लक्ष केंद्रित केल्यास नाशिकमधील पर्यटन स्थळांमध्ये निश्चितच वाढ हाेईल. त्यादृष्टीने अाम्ही याेजना तयार करू. गिरीशमहाजन, पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री