आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका रोजच सांडपाणी सोडते थेट गोदावरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - टाकळी मलजलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे गाेदावरीचे पाणी प्रदूषित हाेत असून, अांघाेळीस योग्य नसल्याचा अहवाल मिळाला अाहे. प्रदूषणामुळे गाेदावरीच्या पाण्याचे बीअाेडी ३० पर्यंत वाढला अाहे. त्यामुळे उपाययाेजनांसाठी "नेरी’’ सल्लागार म्हणून नेमली अाहे.
एेन कुंभमेळ्यात हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने भाविक टाकळी दसक घाटावर अांघाेळ कशी करणार, असा प्रश्न अाहे. गाेदावरी नदीचे पाणी अांघाेळीस याेग्य नसल्याच्या अहवालानंतर शासन सामाजिक, पर्यावरणप्रेमी संस्था, मंडळांनी गाेदा स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.

दुसरीकडे, स्वच्छ गाेदापात्रात पालिकाच दूषित पाणी टाकत असल्याने टाकळीपासून पुढे गाेदावरी प्रदूषित झाली अाहे. टाकळी येथे महापालिकेने गाेदावरीवर पूल उभारला बाजूलाच मलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. ७० एमएलडी क्षमतेचे हे केंद्र कार्यान्वित झाले असून, ४० एमएलडी क्षमतेसाठी काम प्रगतिपथावर अाहे. कार्यान्वित केंद्रातून गाेदावरीत दरराेज ७० एमएलडी दूषित पाणी टाकले जात असल्याने नदीत प्रचंड फेस निर्माण झाला आहे.
परिणामी बीओडीचे प्रमाण ३० पर्यंत वाढले अाहे. विशेष म्हणजे हे पालिकेनेच नेरीच्या निदर्शनास अाणून दिल्यानंतर त्यावर उपाययाेजनेसाठी नेरीकडून प्रयत्न सुरू झाले अाहेत.
मलजलशुद्धीकरण केंद्रातून माेठा पाट तयार करून त्याद्वारे केमिकलयुक्त ७० एमएलडी पाणी नवीन पुलाखाली नदीपात्रात साेडल्याने पाणी साेडल्याच्या ठिकाणापासून काही अंतरापर्यंत फेस अाला असून,दुर्गंधी पसरली अाहे. जेथे पाणी पात्रात पडते त्या बाजूला पात्रात माती टाकून पाणी अडवले असून, पात्राच्या एका काेपऱ्याला माेकळी जागा असल्याने तेथून दसक घाटाकडे वाहत जाणारे पाणी फेसाळच असते.

फेसाळ पाण्याचे काय
सिंहस्थपार्श्वभूमीवर मलशुद्धीकरणाच्या उजव्या बाजूला टाकळी येथे नवीन घाट बांधला अाहे. पुढे दसक-पंचक नांदूर-मानूरला घाट बांधला असून, नाशिक-पुणे रेल्वेने येणाऱ्यांना येथे अांघाेळ करावी लागणार अाहे. येथे दूषित पाण्यामुळे फेस अालेल्या पाण्यात भाविक अांघाेळ करणार का, हा प्रश्न अाहे.

टाकळी केंद्राची स्थिती
मलजलशुद्धीकरणकेंद्रातून रोज बाहेर पडणाऱ्या ७० एमएलडी पाण्यामुळे प्रदूषित पाण्यात ३० टक्के प्रमाण बायाे केमिकल्स ऑक्सिजनचे झाले. नेरीच्या मार्गदर्शनाखाली प्रमाण १० टक्क्यांवर अाणले जात आहे. पाण्यावरील फेस कमी करण्यासाठी उपाययाेजना होत असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.