आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी स्वच्छता मोहिमेने केले नववर्षाचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हरितकुंभ समन्वय समिती सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि आरोग्य विभागाच्या वतीने रामकुंड परिसरातील फुले विक्री करणाऱ्या महिलांकडून रामकुंडासह गोदावरी नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. नववर्षात गोदा स्वच्छतेचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. 
 
हरितकुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे यांच्या संकल्पनेतून नववर्षाचा प्रारंभ गोदावरी स्वच्छतेपासून करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गाेदावरी परिसरात फुले विक्री करणाऱ्या महिलांमध्ये गोदा स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

रामकुंडावर देश-विदेशातील भाविक येतात. गोदावरी प्रदूषणामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या घटते. गोदावरी स्वच्छ राहिल्यास भाविकांची संख्या वाढेल. शहराचा नावलौकिक वाढेल, असे मार्गदर्शन केले. ‘आम्ही आमचे घर, आमचा परिसर, आमची गोदामाई स्वच्छ-सुंदर पर्यावरणपूरक ठेवू, नदीपात्र प्रदूषित करणार नाही होऊ देणार नाही. आम्ही रस्त्यात कोठेही प्लास्टिक कचरा करणार नाही होऊ देणार नाही’, अशी शपथ घेण्यात आली. स्वच्छतेबाबत योगेश बर्वे यांनी मार्गदर्शन केले.नववर्षानिमित्त अायाेजित करण्यात अालेल्या या अभियानात स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, अॅड. अमोल घुगे, योगेश कापसे, रोहित कानडे, प्रकाश बर्वे, चेतन कानडे, किशोर शिंदे, संगीता बोढारे, ताराबाई दिवे, वायडाबाई भोसले, सुनीता दिवे यांच्यासह गोदावरी परिसरातील फुले विक्री करणाऱ्या महिलांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 
 
बातम्या आणखी आहेत...