आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी साखळी : नको काँक्रीटचा घाट, गोदामाईला घेऊ द्या मोकळा श्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे गोदावरीकाठी सुरू केलेल्या घाट काँक्रिटीकरणाविरोधात विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी मानवी साखळीद्वारे ‘नको काँक्रीटचा घाट, गोदामाईला घेऊ द्या मोकळा श्वास’ अशी साद घातली.
तपोवनापासून ते रामकुंडादरम्यान झालेल्या या मानवी साखळीत महिला, युवक, तरुणी, ज्येष्ठांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या साखळीत आपलं पर्यावरण, आर्ट ऑफ लिव्हिंग, हौसला, मानव उत्थान मंच, शिवगर्जना मंडळ, जाणीव, दुर्गयात्री भ्रमण मंडळ, अक्षरबंध ग्रुप, युनिक ग्रुप, राणेनगर परिसर मंडळ आदी सहभागी झाले होते.

फोटो - गोदावरीकाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला शहरातील विविध संस्था व संघटनांनी शनिवारी मानवी साखळी काढून विरोध दर्शविला. या अनोख्या आंदोलनात तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.