पंचवटी - गंगापूर धरणातून पाणी साेडण्यात अाल्याने गाेदावरीला पूर अाला अाहे. जिल्हा प्रशासनाकडून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रविवारी (दि. १६) सकाळी वाजता पाण्याचा विसर्ग झाल्याने गोदावरी दुथडी भरून वाहू लागली. गोदाघाटाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेटिंग करण्यात अाले हाेते. तसेच या रस्त्यावर पाेलिस तैनात करण्यात अाले हाेते.
पंचवटी परिसरातील मालेगाव स्टॅण्ड, गणेशवाडी, अमरधामरोड, रोकडोबा, दहीपुल, एकमुखी दत्तमंदिर, कपालेश्वर, पंचवटी वाचनालय या रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त हाेता. गोदाघाटावर जाण्यास नागरिकांना मनाई करण्यात अाली हाेती. वाहनांना प्रवेश बंद केला होता. पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर सकाळी ११ वाजेनंतर नागरिकांनी गोदाघाटावर गर्दी केली. काहींनी सेल्फी काढत पुराचा आनंद लुटला.
सूचनांकडे दुर्लक्ष
लहान मुलांना सांभाळा, धोकेदायक ठिकाणी जाऊ नका अादी सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र, काही उत्साही तरुण त्याकडे दुर्लक्ष करत पुराच्या पाण्यात उड्या घेत होते.
सेल्फी काढण्याचे अावाहन
नाले,ओढे, ओहळ दुथडी भरून वाहत हाेतेे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला हाेता. गुलमोहर, रशियन बाभुळ या कमकुवत झाडाखांली उभे राहू नका, मुले-विद्यार्थ्यांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी जाऊ नये, नदी काठावर गर्दी करू नका, वाहने-जनावरे यांना पुराच्या पाण्यापासून दूर ठेवा. पुराच्या पाण्याच्या संपर्कात अालेले उघड्यावरील अन्न खाऊ नका. वीजतारा खांबापासून दूर राहा. पूल, नदी, ओढे, नाले, धरण परिसर, धबधबा आदी ठिकाणी सेल्फी काढण्याचे आवाहन पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत होते.
नागरिकांनी सूचनांचे पालन करावे
^धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे नदीला पूर आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये. नदीकाठी पुलावर गर्दी करू नये. पाेलिसांच्या सूचनांचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही दुर्घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. प्रशासनास सहकार्य करावे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त
रविवारी १६ मि.मी. पाऊस
शहरातचार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून रविवारी (दि. १६) १६.२ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. शहरातील इंदिरानगर, सिडको, सातपूर, पंचवटी, मेरी, म्हसरुळ, नाशिकरोड, उपनगर, जेलरोड, देवळाली कॅम्प परिसरात गत चार दिवसांपासून पाऊस बरसत अाहे. रविवारी शहरवासियांना आपली सुटी पाल्यांसोबत घरामध्येच घालवावी लागली. पावसामुळे शहरातील व्यवसायांवर परिणाम झाला आहे. रविवारी दिवसभर सरी काेसळत हाेत्या. हवामान खात्याने २० जुलैपर्यंत जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला अाहे.
पर्यटकांना आवाहन
धार्मिक यात्रा पर्यटनासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांनी पर्टकांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात स्थळांची माहिती द्यावी. प्रशासनास अडचणीच्या काळी मदत करणे शक्य होईल, असे आवाहन करण्यात येत होते.