आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोर्डरूम ते मुसाफीर उलगडला प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मी बालपणापासूनच कोणत्याही परीक्षेसाठी कधी अभ्यास केला नाही. वेगवेगळ्या विषयांत रुची वाटत गेली म्हणून त्यात रस घेऊ लागलो. त्यामुळे पुस्तके जरी मी गेल्या दशकभरापासून लिहायला लागलो असलो तरी त्या विषयांचे बीज माझ्या मनात बालपणापासून रुजत जाऊन हळूहळू ते बहरत गेल्याचे सांगत प्रख्यात आयटीतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी त्यांचा ‘बोर्डरूम ते मुसाफीर’ हा लेखनप्रवास उलगडला.

अक्षरधारा, रोहन प्रकाशन व पु. ना. गाडगीळ यांच्या वतीने आयोजित ‘माय मराठी शब्दोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गोडबोले यांनी त्यांच्या सोलापुरातील बालपणापासूनचा काळ आणि जीवनप्रवास प्रारंभी कथन केला. अनेक कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदांवर काम करताना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्याचे ठरविताना ते मराठीतच लिहायचे हाही निश्चय केला. त्यामुळेच सर्वप्रथम बोर्डरूम लिहिले. त्याआधी काही काळ मी दारूच्या प्रचंड आहारी गेलो. मात्र, जॉब टिकविण्यासाठी आणि स्वत:च्या ऑटिझमग्रस्त मुलासाठी काही पैसा जमा करून ठेवावा लागेल, या विचारातून एका रात्रीत दारू सोडली ती कायमचीच, असेही गोडबोले यांनी नमूद केले. या वेळी लेखकांना अत्युत्तम पत्रलेखन करणार्‍या मधुकर साठे, दत्तात्रय कोठावदे, सुषमा अहिरराव, महेंद्र पांगारकर आणि प्रतिभा गोवर्धने यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.