आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gokhale Musical Pratishthan Latest News In Divya Marathi

गोखले प्रतिष्ठानने उलगडला नाट्यगीतांचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राधाधर मधू मिलिंद..,’ ‘ऋतुराज आज..,’ ‘मधुकर वनवन..,’ ‘गुंतता हृदय हे..,’ ‘अवघाची संसार’ यांसारखी एकसेएक नाट्यगीते सादर करून विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानने नाशिकच्या गान रसिकांना चिंब केले. अतिशय संथ, मोजके संगीत आणि त्याच तोडीची गायकी यामुळे नाट्यगीतांचा ‘ब्लॅक अँण्ड व्हाइट’ काळ अत्यंत सहजरित्या उलगडत गेला.
शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी झालेल्या या संगीत कार्यक्रमात प्रारंभी अरगडे यांनी यमन रागात ‘राधाधर मधू मिलिंद जय जय’ हे नाट्यगीत सादर केले. त्यानंतर विद्याधर गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या प्रसिद्ध नाटकातील ‘ऋतुराज आज वनी आला’ हे नाट्यपद मृणाल जोशी यांनी सादर केले.
विशेष म्हणजे, या मैफलीला त्याच तोडीची संगीत साथ लाभली. आदित्य कुलकर्णी यांनी तबल्यावर, तर भक्ती बोरसे यांनी हार्मोनियमवर साथ केली. मनोज पारनेरकर यांनी सूत्रसंचालन केले.
उत्तरोत्तर रंगत गेली मैफल..
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीत ‘गुंतता हे हृदय’ हे नाट्यगीत विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी सादर केले. त्यानंतर ‘हासता खेळता’ हे नाट्यगीत सायली देव, ‘उडूनी जा पाखरा’ हे मृणाल जोशी, ‘लेऊ कशी वल्कला’ हे जुई कुलकर्णी, ‘त्या मदन मनोरम’ हे रश्मी आगरकर, ‘क्षण आला भाग्याचा’ हे रसिका नातू, ‘तारिणी नव वसन’ हे मृदुला देव, ‘गर्द सभोती’ हे मेघा जहागिरदार, ‘खेळेल का देव’ हे र्शुती जोशी, ‘मी पुन्हा वनांतरी’ हे नंदा देशपांडे, ‘अवघाची संसार’ हे आभा लिमये, ‘आगा वैकुंठीच्या राया’ हे नाट्यगीत जुई कुलकर्णी यांनी सादर केले.