आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भरदिवसा दुकानात घुसून लाखाची सोन्याची साखळी पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण असताना भरदिवसा दुकानात घुसून महिलेच्या गळ्यातील एक लाखाची सोनसाखळी दोघांनी हिसकावून नेल्याची घटना गोविंदनगर भागात घडली. या पाठोपाठ आणखी अशा दोन घटना घडल्या.


अलका अशोक व्यवहारे (रा. गोविंदनगर) यांच्या गिफ्ट आर्टिकल दुकानात दुपारच्या सुमारास पल्सरवरून आलेल्या दोघांनी 100 रुपयांचे स्टीकर खरेदीचा बहाणा करत व्यवहारे याच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत पळवली. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास टिळकवाडीतील रामायण बंगल्यासमोरून जाणार्‍या शहा नामक वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा प्रयत्न झाला. तिसरा प्रकार औरंगाबाद नाक्यावरील रहिवासी भागात घडला. मात्र, जागरूक महिलेने दुचाकीवरील चोरट्यांनी पोत हिसकावताच प्रतिकार केल्याने साखळी टाकून चोरटे पळाले.