आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपुष्यामृतावर सोने चकाकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृताला सोन्याला खऱ्या अर्थाने झळाळी प्राप्त झाल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. दोनच दविसांत प्रती दहा ग्रॅमसाठी एक हजार रुपयांनी सोन्याचे, तर दोन हजार रुपयांनी वाढलेले चांदीचे प्रती किलोमागील भाव असे चित्र असतानाही ग्राहकांनी मनसोक्त सोने खरेदी केल्याने सराफी पेढ्या गजबजल्या होत्या. स्थानिक सराफी बाजारात शुद्ध सोन्याचे भाव प्रती दहा ग्रॅमसाठी २६,१०० रुपये तर, चांदीचे भाव ३६,५०० रुपयांच्या आसपास होते.
सिंहस्थ आणि वर्षातील अखेरचा गुरुपुष्यामृत असल्याने ग्राहकांनी मुहूर्तावरील सोने खरेदीला विशेष पसंती दिली. विशेष म्हणजे या मुहूर्तावरील खरेदीला प्रोत्साहन मिळावे म्हणून सराफी पेढ्यांनी सोने अलंकारांच्या मजुरीवरही विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. याचाच चांगला परिणाम बाजारपेठेत दिसून आला.

दोन दविसांपासून डाॅलरच्या तुलनेत रुपयाची पडझड होत असल्याने सोन्याची किंमत वधारत आहे. दोनच दविसांत स्थानिक बाजारात हे दर प्रती दहा ग्रॅममागे १००० रुपयांपर्यत वाढलेले दिसून आले. ग्राहकांनी सोन्याची नाणी, बिस्किटे, वेढा यांसह चेन, पाटल्या, मंगळसूत्र आणि अंगठ्यांना विशेष पसंती दिली.

अलंकारांसह चोख सोन्यालाही मागणी
सोनेअलंकारांसह नाणी, वेढ्यालाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली. चोख सोनेखरेदी गुंतवणूकदृष्ट्या चांगली ठरेल. राजेंद्रवाघाडकर, सराफ व्यावसायिक

दिनांक दर (प्रति १० ग्रॅम)
११आॅगस्ट २०१५ २५,४०० रुपये
१२ आॅगस्ट २०१५ २५,८०० रुपये
१३ आॅगस्ट २०१५ २६,३०० रुपये

तेजी वाढत राहणार
साेन्याचे भाव कमी कमी होत जाण्याची प्रक्रिया आता बंद झाली असे म्हणावे लागेल. सोन्यात येत्या काळात पुन्हा तेजी पाहायला मिळेल. नीलेशबाफणा, सराफ व्यावसायिक