आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धा: नाशिकच्या किसन तडवी, ताई बामणेला सुवर्णपदक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किसन तडवी, ताई बामणे - Divya Marathi
किसन तडवी, ताई बामणे

नाशिक- अांध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय ज्युनिअर शालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत सोमवारी नाशिकच्या किसन तडवीने १०००० मीटर गटात तर ताई बामणेने ८०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. किसनने ३० मिनिटे ४१ सेकंद अाणि ५७ शतांश सेकंद तर ताईने मिनिटे १३ सेकंद अाणि ६२ शतांश सेकंद वेळ नोंदविली. उत्तर प्रदेशच्या अरुणकुमारने ३० मिनिटे ४७ सेकंद तर उत्तराखंडच्या माेहन सैनीने ३१ मिनिटे १२ सेकंदांसह अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. ताईपाठाेपाठ केरळच्या सँड्रा ए. एस. हिने मिनिटे १७ सेकंद २४ शतांश सेकंद तर तेलंगणाच्या डी. भाग्यलक्ष्मीने मिनिटे १७ सेकंद ५४ शतांश सेकंदांसह अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. किसन ताईला महिंद्रा कंपनीचे प्रायाेजकत्व लाभले असून, प्रशिक्षक विजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाेंसला शाळेच्या मैदानावर सराव करतात. 


किसनचे दुसरे सुवर्ण
किसनने अाशियाईसह अन्य अांतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली असतानाही त्याला प्रारंभी महाराष्ट्राच्या संघात स्थान देण्यात अाले नव्हते. मात्र, अखेरच्या टप्प्यात राज्य अॅथलेटिक्सच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना उपरती झाली. त्यानंतर किसनचा समावेश हाेऊन त्याने महाराष्ट्राला के अाणि १० के अशा दाेन प्रकारांत दाेन सुवर्णपदके मिळवून देण्याचा पराक्रम करून दाखवला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...