आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये मुहूर्तावर मनसोक्त सोनेखरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा नाशिककरांनी यंदाही पाळल्याने गुरुवारी शहरातील सराफी पेढय़ा दिवसभर गजबजलेल्या होत्या. हौसेखातर बांगड्या, नेकलेस यांसारख्या दागिन्यांच्या खरेदीसह गुंतवणूक म्हणून नाणे, वेढणे यांसारख्या चोख सोन्यासह चांदीची भांडी, नाणे, बिस्किटे खरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल होता. दिवाळीनंतर लगेचच सुरू होत असलेल्या लग्नसराईचाही प्रभाव खरेदीवर दिसून आला.

गेल्या दोन महिन्यांत सोन्याने तोळ्यामागे 27 हजारांचाही आकडा पाहिल्याने भाव कमी होण्याची अपेक्षा होती. गेल्या पंधरा दिवसांतील बाराशे ते तेराशे रुपयांनी शुक्रवारी भाव कमी राहिल्याने खरेदीत उत्साह दिसत होता. दरम्यान, पंधरवड्यापासून भाव तीस हजारांच्या आसपास स्थिरावल्याचे चित्र निर्माण झाल्याने ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यापुढील सर्वच मुहूर्त अशाच उत्साहात जातील अशी आशा सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली.

चांदीला विशेष मागणी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांदी खरेदीचे महत्त्व असल्याने चांदीची भांडी, नाणी, बिस्किटे, ताट-वाटी, निरांजनी, स्टर्लिन सिल्व्हर, पणत्या यांना मागणी होती. त्यातही नाशिक घाटाच्या भांड्यांना आणि चोख चांदीला विशेष मागणी राहिली.


डायमंडलाही मागणी
ग्राहकांनी थांबा व पहाची भूमिका सोडून प्रत्यक्ष खरेदीत उत्साह दाखविल्याचे चित्र आज होते. पंधरा दिवसांतील कमी भाव शुक्रवारी राहिल्याने ज्वेलरी, बँगल्स, नेकलेस आणि अनकट डायमंडला मागणी राहिली. सम्यक सुराणा, संचालक, सुराणा ज्वेल्स

खरेदीचा उत्साह
दिवसभर मुहूर्तावरील खरेदीचा उत्साह दिसून येत होता. चांदीची भांडी, बिस्किटे, नाणी यांसह सोन्याच्या दागिन्यांत गंठण, मंगळसूत्र, चेन यांची मनपसंत खरेदी ग्राहकांनी केली. उत्तम प्रतिसाद होता. मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

खरेदीचा योग साधला
हाती आलेल्या बोनसच्या पैशांनी दिवाळीला खरेदी म्हणून सोने खरेदीकडे शहरवासीयांचा कल दिसला. दागिन्यांना विशेष मागणी होती. लग्नसराईचाही परिणाम खरेदी वाढण्यात होता. महेश आडगावकर, संचालक, आडगावकर सराफ