आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपुष्यदिनी सोने खरेदीत दहा कोटींची उलाढाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर गुरुवारी शहरात सोने व रत्नांच्या खरेदीत दहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

चोख सोने व दागिन्यांना मोठी मागणी राहिली. शहरातील सर्वच सराफी पेढय़ा सकाळपासून रात्रीपर्यंत गजबजल्या होत्या. सोन्याचा भाव प्रतितोळा (10 ग्रॅम) 30,500 रुपये होता.

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने व पुष्कराज खरेदीला विशेष महत्त्व आहे. सध्या बाजारात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर गुरुपुष्यामृत आल्याने ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल उत्सुकता होती. मात्र, गुंतवणुकीच्या या सुरक्षित पर्यायाबद्दल समाजामध्ये आकर्षण अजूनही कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवसभर चांगली मागणी - सोन्याचे वेढे, शिक्के, दागिने यांना दिवसभर चांगली मागणी राहिली. उलाढाल चांगली झाली. राजेंद्र ओढेकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन