आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने पुन्हा 31 हजारांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र शासनाने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याची किंमत एका दिवसात तोळ्यामागे 400 रुपयांनी वाढली असून, मंगळवारी सोन्याचा भाव पुन्हा 31 हजारांवर पोहोचला आहे.
देशात कच्च्या तेलाच्या आयातीपाठोपाठ सोन्याच्या आयातीवर सर्वाधिक खर्च होत असल्याने या आयातीमध्ये घट आणण्याच्या उद्देशाने केंद्राने सोन्याचे आयात शुल्क 4 टक्क्यांवरून 6 टक्के केले आहे. या प्रक्रियेमुळे त्वरित महानगरातील सराफी व्यावसायिकांकडील सोन्याच्या दरात तोळ्यामागे सुमारे 400 रुपयांची वाढ झाली आहे. गत आठवडाभर सोन्याचे भाव सातत्याने 31 हजारांपेक्षा कमी होते. रविवारी 30,800 असलेला चोख सोन्याचा भाव आयात शुल्क वाढीमुळे मंगळवारी 31,200 रुपये झाला होता.
परिणाम नाही
ही दरवाढ ग्रॅममागे चाळीस रुपये इतकीच असल्याने व्यवसायावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच याबाबत खरेदीदारांचेदेखील काहीच म्हणणे नाही. वृजेंद्र वाकचौरे, व्यवस्थापक, पीएनजी