आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात शुल्कामुळे सोन्याचे भाव वाढूनही सराफ बाजारात तेजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- केंद्र शासनाने आयात शुल्क 4 टक्क्य़ांवरून 6 टक्के करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी सोन्याच्या किंमती प्रती दहा ग्रॅममागे 300 रुपयांनी वाढल्या. मात्र, ग्राहकांमध्ये सोन्याची मोठी क्रेझ असल्याने भाववाढीच्या महागाईचा परिणाम सुवणर्बाजारपेठेवर थोडादेखील झाला नाही. दरम्यान, आयात शुल्क वाढीचा ग्राहकांवरच भुर्दंड पडणार असल्याने व्यापारी या निणर्याबाबत फारसे गंभीर नसल्याची स्थिती होती.

निणर्याला अद्याप विरोध नाही : आयात शुल्कवाढीमुळे सोन्याचे भाव वाढले असले तरी त्याचा परिणाम व्यापार्‍यावर होणार नाही. त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर झाला आहे. ग्राहकच भाववाढीच्या माध्यमातून आयात शुल्क भरणार असल्याने व्यापारी संघटनांकडून या निणर्याला विरोध करण्याबाबत अद्याप पाऊल उचलले गेले नाही.

गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित : सातत्याने वाढत जाणारे भाव ही सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणारी आहे. गुंतवणुकीसाठी सुरक्षित माध्यम म्हणून जमिनींप्रमाणे ग्राहक सोने खरेदीकडे पाहतात. 2008 साली आलेल्या मंदीत सोन्यातील गुंतवणूक महत्त्वपूर्ण ठरली. शेअरबाजारातील गुंतवणूक अनिश्चित झाली असताना गुंतवणूकदार सुरक्षित म्हणून सोन्याकडे पाहत आहेत.

सातत्याने भाववाढ
सुवर्ण बाजारात दररोज भाव कमी अधिक होतात. सातत्याने भाव वाढत असल्याने ग्राहक गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. गेल्या सहा महिन्यात सोने 33 हजारापर्यंत गेले होते. सध्या 31 हजार 600 रुपये भाव आहेत. आयात शुल्कात वाढ झाल्याने त्याचा मागणी किंवा बाजारपेठेवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे आर.सी.बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांनी सांगितले.

गैरप्रकार वाढतील
आयात शुल्क वाढले म्हणून ग्राहक त्याकडे पाहणार नाही. भावातील चढ-उताराचा प्रकार म्हणून ते त्याकडे पाहतील. गुंतवणूक आणि आकर्षण म्हणून खरेदीवर परिणाम होणार नाही. मात्न, किंमतीमधील तफावतीचा फायदा घेण्यासाठी स्मगलिंगचे प्रकार वाढतील. त्यातून गँगवार, गुंडागर्दीला सामोरे जावे लागेल. निर्णय मागे घेण्यासंदर्भात अद्याप संघटनेने निर्णय घेतलेला नाही. अजय ललवाणी, अध्यक्ष,सराफ व्यापारी असोसिएशन